लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरासमोर प्रदूषण ही मोठी समस्या आहे. इंधनावर धावणाऱ्या वाहनांमुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर पर्याय म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नातून नागपूर महापालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’च्या तीन बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्वीडन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे १० ते १५ टक्के इंधनाची बचत होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.सोमवारी स्वीडनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सभापती बंटी कुकडे यांची भेट घेऊन या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये स्वीडन कंपनी(ईपीएस)चे व्यवस्थापकीय संचालक डेनिस अब्राहम, मार्केटिंग अॅनालिस्ट अॅनाकाई आणि बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या दिव्यानी अशोक कुबडे आदींचा समावेश होता. यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते. नितीन गडकरी व बंटी कुकडे यांनी स्वीडन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.शुद्ध पाण्यासाठी आता ‘वॉटर एटीएम’शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने जोसेब इकोलॉजिकल कंपनीतर्फे शहरातील ज्या भागात पाण्याचे नेटवर्क नाही अशा भागासाठी वॉटर एटीएमचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाठोडा येथे ‘वॉटर एटीएम’ लावण्यात येईल. यामध्ये नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्धीकरण केल्या जाईल. या एटीएमला पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी राहणार असून, दर तासाला एक हजार लिटर पाणी उपलब्ध होईल.
नागपुरात स्वीडन तंत्रज्ञानाने होईल १० टक्के इंधन बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:23 IST
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि महापालिकेचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नातून नागपूर महापालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’च्या तीन बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्वीडन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे १० ते १५ टक्के इंधनाची बचत होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
नागपुरात स्वीडन तंत्रज्ञानाने होईल १० टक्के इंधन बचत
ठळक मुद्देपरिवहन समितीची मंजुरी : प्रायोगिक तत्त्वावर तीन ‘आपली बस’मध्ये वापर