शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वरशिल्पचा सुखद 'सुहाना सफर'; ५५ कलाकारांची प्रस्तुती

By नरेश डोंगरे | Updated: October 1, 2023 23:34 IST

अविट गोडीच्या गीतांचा नजराणा, वादकांचीही सुरेल साथ.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मेरी आवाजही पहेचान है...सारखी अनेक अविट गोडीची गाणी गात स्वरशिल्प म्यूझिक अकादमीच्या कलावंतांनी रविवारी सायंकाळी श्रोत्यांना गीत-संगीताची सुखद सफर घडविली.

परसिस्टन्सच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून समाजसेविका कांचनताई गडकरी तर, प्रमूख अतिथी म्हणून 'लोकमत'चे माजी संपादक कमलाकर धारप, माजी महापाैर संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. भाग्यश्री बारस्कर यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची शैली अनोखी होती. अकादमीच्या ५५ गायक, गायिकांनी वेगवेगळ्या धाटणीत एकल आणि समुहात गितांचे सादरीकरण केले. त्यात  राज कपूर, देवानंद, राजेंद्रकुमार, मधुबालापासून तो राजेश खन्ना, अमिताभ, ऋषी कपूर, नितू सिंग, जिनत अमान, रेखा, राखी आणि कमल हसन, रती अग्निहोत्री, मिथून, पद्मीनी कोल्हापूरे, अनिल कपूर, मनीषा कोईराला तो आमिर खान आदीं कलावंतांच्या चित्रपटातील सुपर डूपर हिट गितांचा समावेश होता. 'ज्योती कलश छलके' ने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर कलावंतांनी 'लग जा गले, तेरे चेहरे से नजर नही हटती, नजारे हम क्या देखे, तेरे मेरे बिच मे.., तुमसे मिलकर ना जाने क्यू, तेरा मुझसे है पहले का नाता कोई, तू कितनी अच्छी है ओ... माँ..., पापा कहते है बडा नाम करेंगा, सांसो की जरूरत है जैसे... कुछ ना कहों...कुछ भी ना कहो अशी एकापेक्षा एक सुरेल गीते सादर करीत नव्या जुन्या पिढीतील श्रोत्यांना गीत-संगीताची सुहानी सफर घडविली.कांचनताईंचे जगदंबेला साकडे

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी कांचनताई गडकरी यांनीही श्रोत्यांसमोर जगदंबे आई जगदंबे सत्वर पावशील... म्हणत भक्तीगीतातून जगंदबेला साकडे घातले. आरजे अमोल शेंडे याने कार्यक्रमाचे खुमासदार सादरीकरण करून श्रोत्यांना बांधून ठेवले. तर, निवडक मात्र कसलेल्या वाद्य कलावंतांनीही गायकांना सुरेल साथसंगत करत कार्यक्रमाची उंची वाढविली. 

टॅग्स :nagpurनागपूर