शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

स्वामीनाथन आयोगाची जगात दखल

By admin | Updated: November 18, 2015 03:14 IST

आज पर्यावरण, कुपोषण व दहशतवाद यासारख्या मुद्यांवर जग एकजूट झाले असतांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा संपूर्ण जग एकत्र होत आहे. यासाठी निमित्त ठरत आहे, ...

‘जनमंच’चे आंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जग एकजूट नागपूर : आज पर्यावरण, कुपोषण व दहशतवाद यासारख्या मुद्यांवर जग एकजूट झाले असतांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा संपूर्ण जग एकत्र होत आहे. यासाठी निमित्त ठरत आहे, तो स्वामीनाथन आयोग. ‘जनमंच’ने नुकत्याच ३० आॅक्टोबर रोजी केलेल्या आंदोलनाची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. शिवाय जगाचे शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांकडे लक्ष वेधले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जगापुढे जाताच सर्व देशांना आपल्या येथील शेतकऱ्यांचे सुद्धा हेच प्रश्न व समस्या असल्याची जाणीव झाली आहे. शिवाय त्यातून जागतिक चर्चा घडविण्याचा विचार पुढे आला आहे. अशाप्रकारे केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्या, अशी मागणी ‘जनमंच’ आणि विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’ च्या मंचावर केली.विशेष म्हणजे, जनमंच, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ व ‘अलग अँगल’ या वेगवेगळ्या संस्था व संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकजूट होउन स्वामीनाथन आयोगासाठी संघर्ष सुरू केला आहे. शिवाय ३० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान यूएनतर्फे पॅरिस येथे हवामान परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात जगभरातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर विचार - मंथन होणार आहे. त्यातच ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’च्या संचालिका श्वेता भट्टड यांना कलाविष्काराच्या सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार भट्टड या ७ डिसेंबर रोजी ‘फेथ इन पॅरिस’ यावर कलाविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. या कलाविष्कारामध्ये भट्टड या भारतमातेच्या वेषात स्वत: ला जमिनीमध्ये गाडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधतील. शिवाय या कलेचे प्रात्यक्षिक सुरू असताना जगभरातील शेतकरी स्वामीनाथन आयोगाबद्दल आपआपली मते व्यक्त करणार आहे. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून भट्टड यांचा हा कलाविष्कार आणि जगभरातील विचारवंतांची मते जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतील. या चर्चेत ‘जनमंच’चे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर, ‘जनमंच’चे सल्लागार प्रा. शरद पाटील,भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अभिताभ पावडे, ग्राम आर्ट प्रोजेक्टच्या संचालिका श्वेता भट्टड व अलग अँगलचे ललित विकमशी यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)