शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

धर्मरक्षणार्थ अवतरले ‘स्वामी विवेकानंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:17 AM

परकीय आक्रमणामुळे भारतातील धर्मश्रद्धा ढासळत चालली होती. जनता भौतिकवादाच्या मोहात पडून नास्तिकतेकडे मार्गक्रमण करीत होती. अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद या युगनायकाच्या तेजस्वी बुद्धिमत्तेने अध्यात्माचा प्रसार करून हिंदू धर्म पताका देशाबाहेरही पोहचविली. त्या युगनायकाच्या ओजस्वी व्यक्तिमत्त्वाची गाथा ‘युगनायक स्वामी विवेकानंद’ या नृत्य, गीतसंगीत व पोवाड्यांनी सजलेल्या महानाट्यातून नागपूरकरांनी अनुभवली.

ठळक मुद्देखासदार महोत्सव : गीतसंगीतपूर्ण नाट्यातून युगनायकाची ओजस्वी गाथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परकीय आक्रमणामुळे भारतातील धर्मश्रद्धा ढासळत चालली होती. जनता भौतिकवादाच्या मोहात पडून नास्तिकतेकडे मार्गक्रमण करीत होती. अशा परिस्थितीत स्वामी विवेकानंद या युगनायकाच्या तेजस्वी बुद्धिमत्तेने अध्यात्माचा प्रसार करून हिंदू धर्म पताका देशाबाहेरही पोहचविली. त्या युगनायकाच्या ओजस्वी व्यक्तिमत्त्वाची गाथा ‘युगनायक स्वामी विवेकानंद’ या नृत्य, गीतसंगीत व पोवाड्यांनी सजलेल्या महानाट्यातून नागपूरकरांनी अनुभवली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारीत खासदार सांस्कृतिक महोत्सवात रामकृष्ण मठ, पुणेतर्फे निर्मिती या महानाट्याचा प्रयोग मंगळवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर झाला. महानाट्याचे लेखन मठाचे श्रीकांतानंद महाराज यांनी केले. संकल्पना व संगीत दिग्दर्शन केदार पंडित, कार्यकारी दिग्दर्शन नचिकेत जोग व प्रकाश योजना हर्षवर्धन पाठक यांची होती. दृकश्राव्य असलेल्या या महानाट्यात पडद्यावर स्वामी विवेकानंद काळाची पार्श्वभूमी उलगडणारा पार्श्वस्वर लक्ष वेधून घेतो. विशेषत: इंग्रजांच्या आगमनानंतर भारतातील धर्मश्रद्धावर बौद्धिक प्रहार करण्यात आला. इंग्रजांनी देवालये खंडित करण्याऐवजी देशातील धार्मिक मान्यता व परंपरांना कालबाह्य ठरवत लोकांमध्ये आपल्याच धर्मसंस्कृतीबद्दल हीनतेची भावना निर्माण केली. या नकारात्मक परिस्थितीत १८६३ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या नरेंद्र ऊर्फ विवेकानंदांनी गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या प्रेरणेतून पुन्हा लोकांच्या मनात धर्म संस्कृतीबद्दल आस्था निर्माण केली. देशविदेशातील तत्त्वज्ञानाचे वाचन आणि कठोर साधना यातून त्यांनी ज्ञानसंपादन केले, पण गुरुच्या आशीर्वादामुळे त्यांच्या ज्ञानाला दिशा मिळाली. या साधनेतून ज्ञानवंत झालेल्या या पुत्राने मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी ज्ञानकिरणांची ज्योत फुलविली व अध्यात्माचे विचार व शिकवण जनमानसांमध्ये पेरत अमृत अनुभूतीचे द्वार सर्वांसाठी खुले केले. आपल्या अल्प आयुष्यात केवळ देशातच नाही तर परदेशातही त्यांनी धर्म अध्यात्माच्या ज्ञानाचा प्रचार केला. शिकागो येथील धर्मपरिषद गाजविणारे विवेकानंद सर्वांना हवेहवेसे झाले.विवेकांनदांच्या ओजस्वी गाथेतील घटनांचे व प्रसंगांचे दर्शन महानाट्यात होते. त्या प्रसंगांना यामध्ये गीतसंगीताची जोड देऊन प्रस्तुत करण्यात आले. प्रसंगानुरुप गीतसंगीत व आकर्षक नृत्याविष्काराने हे सादरीकरण चित्तवेधक ठरते. 

नाटकापूर्वी शिवरायांचा पोवाडा सर्वांचे लक्ष वेधतो आणि पुढे याच्या पोवाड्याच्या माध्यमातून होणारे विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन अधिक रोमांचक ठरते. नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाने श्रेष्ठ ठरलेल्या या महापुरुषाच्या ओजस्वी वाणी व तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करणारे हे महानाट्य खरोखरीच प्रेक्षकांना भारावून सोडते.नाट्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विलास डांगरे, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे, कळमेश्वरच्या नगराध्यक्षा स्मृती ईखार, स्वामी श्रीकांतानंद महाराज यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले.पत्रकार व निवेदकांचा सत्कारयावेळी नितीन गडकरी यांच्याहस्ते पत्रकारितेत आयुष्य वाहिलेले ज्येष्ठ पत्रकार कमलाकर धारप, सुधीर पाठक, राजाभाऊ पोफळी, जयंतराव हरकरे, चंद्रमोहन द्विवेदी यांच्यासह उत्कृष्ट निवेदनामुळे कार्यक्रमाची रंगत फुलविणारे अजेय गंपावार, श्वेता शेलगावकर, ओम सोनी, डॉ. कोमल ठाकरे, स्वाती हुद्दार यांचा सत्कार करण्यात आला.