शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर स्वाधार योजनेचा ६० कोटी रूपयांचा निधी मिळाला; विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार 

By आनंद डेकाटे | Updated: May 17, 2023 17:30 IST

Nagpur News राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. ६० कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

आनंद डेकाटे नागपूर : राज्यातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाने दिलासा दिला आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने समाज कल्याण विभागास ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा ६० कोटी रुपयांचा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. यासोबतच स्वाधार योजनेच्या अटी, शर्ती व त्या अनुषंगाने काही बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुलभता निर्माण होणार आहे व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व वेळेत देणे सोयीचे होणार आहे.

राज्यात समाज कल्याण विभागामार्फत ४४१ शासकीय वसतिगृह कार्यरत असून त्यामध्ये ६० हजार विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी सुमारे २५हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना ६० हजार ते ४८ हजार रुपये वार्षिक त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. यापूर्वी शासनाने नुकतेच सदर योजनेसाठी रुपये १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता, तसेच १२ मे रोजी रुपये ६० कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर आयुक्तालयास उपलब्ध झाला आहे.समाज कल्याण विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महत्त्वपूर्ण व यशस्वी योजना आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पाठपुरावा करून निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये लवकरच सुधारणा करण्यात येणार आहेत त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात योजना राबविताना अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये- डॉ.प्रशांत नारनवरे,समाज कल्याण आयुक्त

टॅग्स :Studentविद्यार्थी