लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांबाबत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत आॅनलाईन मते जाणून घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून सर्वाधिक जनजागृती असलेल्या जिल्ह्याला, राज्याला पुरस्कृत करण्यात येणार होते. त्यासाठी जास्तीत जास्त मत नोंदविणे अपेक्षित होते. परंतु राज्याच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अहवालात नागपूर जिल्ह्यात १५०९६ मते नोंदविण्यात आली. त्यामुळे नागपूर जिल्हा सर्वेक्षणात १३ व्या स्थानावर आला. मात्र या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट लोकसंख्येच्या ५ टक्के होते. त्यामुळे जिल्ह्याने नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे समाधान विभागाने व्यक्त केले.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने १ ते ३१ आॅगस्ट दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी ‘एसएसजी १८’ अॅप तयार करण्यात आले होते. हे अॅप अॅण्डरॉईड मोबाईलवर डाऊनलोड करून, त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना द्यायची होती. एका व्यक्तीला एकदाच मत नोंदविता येणार होते. या सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. तरीसुद्धा नागपूरचा क्रमांक इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगलाच माघारला. राज्यात सर्वाधिक २,२१,३२१ मतदान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. त्या खालोखाल सोलापूरचा क्रमांक लागतो. सोलापुरात १,७४,७३० लोकांनी मतदान केले. सर्वेक्षणातून आलेल्या निष्कर्षाच्या आधारे संपूर्ण भारतातील जिल्ह्यांचे व राज्याचे स्वच्छतेच्या बाबतीत स्थान आणि क्रमावारी निश्चित होणार आहे. सर्वेक्षणात सर्वोच्च स्थान प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यांना आणि राज्यांना २ आॅक्टोबरला सन्मानित करण्यात येणार आहे. परंतु मतदानाच्या अत्यल्प नोंदणीमुळे नागपूर जिल्हा या पुरस्कारातून बाद झाला आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहे.राज्यातील काही जिल्ह्यांचे मतदाननाशिक २२१३२१सोलापूर १७४७३०सातारा १२८७०३कोल्हापूर १०९५२०अहमदनगर ९४८५३सांगली ८९४०९पुणे ५३२२४रायगड ४९६७४बुलडाणा ४६५७९चंद्रपूर ४१५८७सिंधदूर्ग २९२५८उस्मानाबाद २७१११गोंदिया २४५६६नांदेड २४२७५अमरावती २४१९५जळगाव २२४९१बीड २०७४८वर्धा १७३९२नागपूर १५०९६
स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर जिल्हा १३ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:48 IST
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमांबाबत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत आॅनलाईन मते जाणून घेण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून सर्वाधिक जनजागृती असलेल्या जिल्ह्याला, राज्याला पुरस्कृत करण्यात येणार होते. त्यासाठी जास्तीत जास्त मत नोंदविणे अपेक्षित होते. परंतु राज्याच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या अहवालात नागपूर जिल्ह्यात १५०९६ मते नोंदविण्यात आली. त्यामुळे नागपूर जिल्हा सर्वेक्षणात १३ व्या स्थानावर आला.
स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर जिल्हा १३ व्या स्थानी
ठळक मुद्देउद्दिष्टाचा टप्पा गाठला : १५ हजारावर नागरिकांनी नोंदविली आॅनलाईन मते