लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आली. पोलिसांनी विधानभवन चौकाजवळ आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:25 IST
दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आली. पोलिसांनी विधानभवन चौकाजवळ आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात
ठळक मुद्देविधानभवनाजवळ अडविले : पालकमंत्र्यांनी दिले बैठकीचे आश्वासन