शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

कचरा वेचणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: May 22, 2016 02:44 IST

सदरमधील व्यापाऱ्याने कचरा वेचणाऱ्या एका गरीब इसमाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने मोहननगरातील चौरसिया चौकाजवळ

मोहननगरातील घटना : हत्येची चर्चा;पोलिसांचा इन्कारनागपूर : सदरमधील व्यापाऱ्याने कचरा वेचणाऱ्या एका गरीब इसमाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चेने मोहननगरातील चौरसिया चौकाजवळ शनिवारी सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनीही हा हत्येचाच प्रकार असल्याचे दुपारी सांगितले होते. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर पोलिसांनी ती हत्या नव्हे तर आकस्मिक मृत्यूचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. मृताचे नाव भावेश ऊर्फ नरेश असून, तो कुठला आहे ते रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही. मृत भावेश पन्नी, प्लास्टिक असा कचरा वेचून पोट भरत होता आणि रेल्वे स्थानकाजवळच्या फुटपाथवर झोपत होता. शुक्रवारी दुपारी ११ ते १२ च्या सुमारास तो पांडू चौरसियाच्या दुकानाजवळ कचरा गोळा करीत होता. उन्हामुळे धाप लागल्याने तो दुकानाच्या शेजारी सावलीत बसला. पांडूने त्याला तेथून शिवीगाळ करून हाकलण्याचा प्रयत्न केला. भावेशने शिवीगाळ करू नका, थोड्या वेळाने जातो, असे सांगितले. त्यामुळे पांडूने त्याला तेथून हाकलण्यासाठी मारहाण केली. भावेशची केविलवाणी आरडाओरड ऐकून बाजूचा दुकानदार धावत आला. त्याने पांडूच्या तावडीतून भावेशला सोडवले आणि बाजूला नेऊन बसवले. त्यानंतर मदत करणारा निघून गेला. आज सकाळी व्यापारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्याला भावेश ज्या ठिकाणी बसला होता त्या गोविंद भवनजवळ तसाच बसून दिसला. त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आजूबाजूची मंडळी मोठ्या संख्येत गोळा झाली. पांडूने मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होऊ लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सदरचे ठाणेदार मनोज सिडाम पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह मेयोत नेला. पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनीही धाव घेऊन संतप्त जमावाला शांत केले. घटनाक्रम माहिती पडल्यानंतर मारहाण करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)प्रकरणाला कलाटणीबेदम मारहाणीमुळे अंतर्गत दुखापत झाली आणि त्यामुळेच भावेशचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज मेयोतील डॉक्टरांनी व्यक्त केला. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट करताना दारूमुळे भावेशचे फुफ्फुस सडले होते. मारहाण झाल्यानंतर अशक्तपणामुळे तो तसाच पडून राहिला. उन्हाचा तडाखा आणि कोणतेही उपचार मिळाले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलीस म्हणतात. त्यामुळे ताब्यात घेतलेल्याला पोलिसांनी सायंकाळी सोडून दिले.