शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर लोहमार्ग पोलिसातील दोन शिपाई निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:03 IST

काम करताना बेजबाबदारपणाचा आरोप ठेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सोमवारी हा आदेश काढला असून, आदेशानुसार दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातून आरोपी पलायन प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काम करताना बेजबाबदारपणाचा आरोप ठेवून लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी सोमवारी हा आदेश काढला असून, आदेशानुसार दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची नोटीस बजावण्यात आली आहे.भोजराज प्रधान आणि नितीन मानकर अशी निलंबित करण्यात आलेल्या शिपायांची नावे आहेत. राजीव दुबे (३९) रा. मुंबई तसेच मूळ नागपूरच्या रमीक सोसायटी, उत्थाननगर, गोरेवाडा रिंगरोड येथील रहिवासी आहे.त्याने मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून शेगाव रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. ही घटना शनिवारी घडली. शनिवारी सकाळी आरोपी दुबेला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून त्याचे बयान घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी दुबे ठाण्यातून फरार होण्यात यशस्वी झाला. प्रधान आणि मानकर यांना निलंबनाची नोटीस मिळताच, पुढील कारवाई कुणावर होणार, याबाबत मुख्यालय आणि लोहमार्ग पोलीस ठाण्यात चर्चा सुरू आहे.प्रभारी अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात बदलीया प्रकरणातील आरोपी राजीव दुबे फरार झाल्याच्या प्रकरणात पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी ठाण्यातील तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप गोंडाणे यांची तात्काळ प्रभावाने नियंत्रण कक्षात बदली केली आहे.आरोपी अद्यापही फरारचफरार झालेला आरोपी राजीव दुबे अद्यापही फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. ठाण्यातून पळून गेल्याबद्दल आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबेला अटक केल्यानंतर त्यास शेगाव लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपी राजीव दुबेला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर डायरीवर महिला कर्मचारी होती. विशेष म्हणजे तिचा डायरी सांभाळण्याचा हा पहिला दिवस होता. ठाण्यात कोणतेही प्रकरण आल्यानंतर त्यावेळी जो अधिकारी असतो त्याच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येतो. अशास्थितीत नाईट ऑफिसरसोबत चर्चा करून पुढील कारवाई करण्यात आली. त्यानंतर डे ऑफिसर आले. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. यात डे आणि नाईट ऑफिसर सारखेच जबाबदार असल्याची चर्चा लोहमार्ग पोलिसात सुरू आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसsuspensionनिलंबन