शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गांधीबाग झोनचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:54 IST

शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या.

ठळक मुद्देघाण बघून आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी : दोन अधिकाऱ्यांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या.स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. घाण वा कचरा आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी आधीच दिला होता. त्यानुसार कारवाई करीत गांधीबाग झोनचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील तुर्केल यांना निलंबित करण्यात आले. तसेच झोनल अधिकारी सुरेश खरे व निरीक्षक करण सिंह बेहुनिया यांना कारणे द्या नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अनेकदा बैठकी घेतल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी निर्देश दिले. कचरा संकलन व स्वच्छतेच्या बाबतीत दक्षता बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी बैठकीतून दिला होता. आयुक्तांनी आधी झोन स्तरावर दौरा करून स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यानंतर आयुक्तांनी आकस्मिक भेटी देऊ न स्वच्छतेची पाहणी करण्याला सुरुवात केली. १५ जानेवारीला आयुक्तांनी गांधीबाग झोनचा दौरा केला. झोनच्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी घाण आढळून आली.कचरा संकलन केंद्रावर कचऱ्याचे ढिगारे आढळून आले. तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात वरिष्ठ आरोग्य निरीक्षक तुर्केल यांना खुलासा मागण्यात आला. त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने आयुक्तांनी तुर्केल यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. तसेच झोनल अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. यापूर्वी स्वच्छतेच्या संदर्भात नेहरुनगर झोनचे आरोग्य निरीक्षक मदन नागपुरे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतरही स्वच्छतेबाबत झोन स्तरावरील अधिकारी गंभीर नसल्याचे दिसत आहे.उशिरा आल्यास वेतन कपातड्युटीवर उशिरा येणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळायला आयुक्तांनी सुरुवात केली आहे. डिसेंबर पेड इन जानेवारीमध्ये मिळणाऱ्या वेतनातून निर्धारित वेळेत पंचिंग न झाल्यास वेतनात कपात करण्यात येणार असल्याबाबत परिपत्रक काढले आहे. यावर कर्मचारी संघटनांनी आक्षेप नोंदविला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते प्रशासन अशा स्वरुपात वेतनातून थेट कपात करू शकत नाही. नियमानुसार वेळेत कामावर हजर न झाल्यास संचित रजेतून ही रक्कम कापणे अपेक्षित आहे. वेतन कपातीच्या मुद्यावरून कर्मचारी संघटना व प्रशासनात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या निर्देशानुसार याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाsuspensionनिलंबन