शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील निलंबित पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:15 IST

पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या शहरातील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना परत पोलीस दलात रुजू करून घेण्यात आल्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे, पाचपैकी वादगस्त पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना केवळ दीड महिन्यांपूर्वीच निलंबित करण्यात आले होते. या आदेशामुळे वादग्रस्त पोलीस कर्मचारी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हावी झाल्याची जोरदार चर्चा शहरात पसरली आहे.

ठळक मुद्देलॉबिंग यशस्वी : दीड महिन्यात निलंबन मागे : पुन्हा झाली नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या शहरातील एका वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यासह पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यांना परत पोलीस दलात रुजू करून घेण्यात आल्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे, पाचपैकी वादगस्त पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना केवळ दीड महिन्यांपूर्वीच निलंबित करण्यात आले होते. या आदेशामुळे वादग्रस्त पोलीस कर्मचारी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर हावी झाल्याची जोरदार चर्चा शहरात पसरली आहे.मंगेश देशमुख, जयंत शेलोट, आयशा शेख, विवेक मरस्कोल्हे आणि मनोज घोडे अशी निलंबनानंतर रुजू होण्याचा आदेश मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी घोडेला १९ मार्च २०१८ ला, मरस्कोल्हेला ५ एप्रिलला, आयशा यांना २१ आॅगस्ट, शेलोटला २१ सप्टेंबरला तर देशमुखला २८ सप्टेंबरला निलंबित करण्यात आले होते. या पाचही पोलिसांवर कर्तव्यात कसूर करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आयशाने एका दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. देशमुखची आॅडिओ क्लीप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचली होती. तर, शेलोट हा शहरातील कुख्यात गुन्हेगारांसोबत ‘तेरे जैसा यार कहां’च्या गाण्यावर नाचत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. शेलोटच्या या व्हिडीओत अवैध धंद्यातगुंतलेल्यांसह कुख्यात गुन्हेगारही दिसत होते. शेलोटवर अनेकदा गंभीर आरोप लागले असून, एका प्रकरणात तो कारागृहातही राहून आला आहे. त्याला निलंबित करण्यात आल्यानंतर शहरातील पोलीस कर्मचारीच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले होते. दुसरीकडे सर्वांसोबत लाडीगोडीचे संबंध ठेवणारे अनेक दलाल सक्रिय झाले होते. त्यांनी जोरदार लॉबिंग केले आणि अधिकाऱ्यांचे मन वळवून अखेर केवळ दीड महिन्यात शेलोटला पुन्हा रुजू करून घेण्यात यश मिळविले. निलंबित कर्मचाऱ्याला किमान तीन महिने पुन्हा सेवाबहाली करू नये, असा एक दंडक पाळला जात होता. देशमुख-शेलोटच्या प्रकरणात हा दंडक बासनात गुंडाळण्यात आला. या निर्णयामुळे खुद्द पोलीस दलातच खळबळ निर्माण झाली आहे. अन्य निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हाच दंडक पाळला जाणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसnagpurनागपूर