शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

सीपी क्लबचा परवाना निलंबित

By admin | Updated: May 27, 2016 02:39 IST

सीपी क्लबच्या संदर्भात मिळालेल्या तक्रारीवरून किचनची तपासणी केली असता घाण असल्याचे निदर्शनास आले.

किचनमध्ये आढळली घाण : एफडीएवरही आरोपनागपूर : सीपी क्लबच्या संदर्भात मिळालेल्या तक्रारीवरून किचनची तपासणी केली असता घाण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने(एफडीए)सीपी क्लबचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित केला. निलंबनापूर्वी एफडीएने क्लबला व्यवस्था सुधारण्याचा व कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला होता. त्यावर उत्तर देण्यासाठी सीपी क्लब प्रशासनाने वेळ मागितला. त्यानंतरही कुठलीही सुधारणा झाली नाही. शेवटी एफडीएने परवाना निलंबनाची कारवाई केली.एक वर्षापूर्वी मिळालेल्या तक्रारीवरून १७ नोव्हेंबर २०१५ ला एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सीपी क्लबची तपासणी केली होती. यात पाण्याच्या टाकीत घाण आढळली. टाकी स्वच्छतेचा कुठलाही रेकॉर्ड क्लबकडे नव्हता. कर्मचाऱ्यांचा मेडिकल अहवाल, पेस्ट कंट्रोलचा अभाव, शाकाहारी व मांसाहारी अन्न एकाच फ्रीजमध्ये ठेवलेले आढळले. पाण्याच्या सॅम्पलचाही रिपोर्ट नव्हता. किचनमध्ये काम करणाऱ्यांनी अ‍ॅप्रॉन, कॅप व हॅन्डग्लोव्हज घातलेले नव्हते. कचरापेटी उघडी होती. किचनची चिमणी साफ केलेली नव्हती. त्यामुळे १० मे २०१६ रोजी एफडीएचे अधिकारी एन.आर. वाकोडे यांनी द बेकर्स सीपी क्बलचा परवाना निलंबित करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)ही माहिती सार्वजनिक का केली नाहीग्राहकांचे हित लक्षात घेता सीपी क्लबमधील घाणीचे प्रकरण मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणे आवश्यक होते. परंतु एफडीएचे सहआयुक्त देसाई यांनी तसे केले नाही. एफडीएने याप्रकरणी ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून व्यवस्थापकाचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पुढे काही निष्काळजीपणा झाल्यास अ‍ॅन्टी अ‍ॅडल्ट्रेशन सोसायटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावेल.-मो. शाहिद शरीफ, अध्यक्ष अ‍ॅन्टी अ‍ॅडल्ट्रेशन सोसायटी