शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट कार उभ्या कंटेनरवर आदळली; चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 12:57 IST

माेहगाव शिवारातील उड्डाणपुलावरील घटना

बुटीबाेरी (नागपूर) : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार राेडलगत उभ्या असलेल्या कंटेनरवर मागून जाेरात आदळली. यात चालकाचा गळा चिरला गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा महामार्गावरील माेहगाव शिवारातील उड्डाणपुलावर रविवारी (दि. २४) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

प्रशांत लक्ष्मण येसंबरे (३७, रा. अंबाझरी, नागपूर) असे मृताचे नाव आहे. प्रशांत हा बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील केईसी इंटरनॅशनल नामक कंपनीमध्ये कारचालक म्हणून नाेकरी करायचा. ताे रविवारी रात्री काम आटाेपून एमएच-४०/एआर-७४५० क्रमांकाच्या कारने बुटीबाेरीहून नागपूरला जायला निघाला हाेता. ताे माेहगाव शिवारातील उड्डाणपुलावर पाेहाेचताच त्याचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि ती कार थेट राेडलगत उभ्या असलेल्या नादुरुस्त एनएल-०१/क्यू-९११५ क्रमांकाच्या कंटेनरवर मागून आदळली.

धडक एवढी जबर हाेती की, कारच्या छताचा पत्रा निघाला व त्या पत्र्यामुळे प्रशांतचा गळा चिरला. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर एक दुचाकीचालक जखमी झाला. जखमी दुचाकीचालकाचे नाव कळू शकले नाही. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. पाेलिसांनी जखमी दुचाकीचालकास बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी सय्यद अशपाक अली अकबर अली, रा. हनुमान नगर, डोंगरगाव, ता. नागपूर ग्रामीण यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नाेंद केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश पालीवाल करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर