शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच सरोगेट मदर प्रकरणास मंजूरी; जिल्हा वैद्यकिय मंडळाचा निर्णय

By सुमेध वाघमार | Updated: February 29, 2024 21:14 IST

सरोगसी कायदाची अंमलबजावणी

सुमेध वाघमारे, नागपूर : सरोगसी कायदा २०२१ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वैद्यकिय मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाने पहिल्यांदाच गुरुवारी सरोगेट मदर प्रकरणास मंजूरी दिली आहे. यामुळे जे पती-पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आशेचे किरण ठरण्याची शक्यता आहे. 

जिल्हा वैद्यकिय मंडळात अध्यक्षस्थानी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. राठोड असून सदस्यांमध्ये स्त्रीरोग तज्ञ व डागाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, वरीष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी थोरात, वरीष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मडावी व डॉ. जयश्री वैद्य आदींचा समावेश आहे. या मंडळाकडे आलेल्या अर्जावर  निर्णय घेण्यापूर्वी सरोगेट आई या स्वत: कोणाचेही दबावाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता इच्छेनुसार सरोगसी प्रक्रियेला सामोरे जात असल्याची खात्री प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात आली. तसेच सरोगेट आई व सरोगसी इच्छुक कुटुंबीयाची शारीरिक व मानसिक वैद्यकिय अहवालाच्या आधारावर मंडळाने सवार्नुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. या बैठकीस मंडळातील सदस्यांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. रिना लांजेवार व अ‍ॅड. आनंद भिसे व सरोगसी इच्छुक कुटुंबीय, सरोगेट आई मंडळासमोर उपस्थित होते.

-सरोगसी म्हणजे काय?

सरोगसी म्हणजे एक स्त्री आणि दुसरे जोडपे किंवा एकल पालक (सिंगल पॅरेन्ट) यांच्यातील करार होय. जेव्हा पती-पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाहीत तेव्हा दुसºया स्त्रिच्या पोटातून मुलाला जन्म देण्यास सरोगसी म्हणतात. ज्या स्त्रिच्या गर्भाला मूल जन्माला घालण्यासाठी भाड्याने घेतले जाते, तिला सरोगेट मदर असे म्हणतात.

-सरोगसीचे दोन प्रकार 

- पारंपारिक सरोगसी : वडिलांच्या शुक्राणूंना दुसºया स्त्रिच्या स्त्रिबिजांसह फलित केले जाते. - गर्भधारणा सरोगसी : या प्रकारामध्ये आई-वडिल या दोघांचे स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे मिश्रण टेस्ट ट्यूब पद्धतीने करुन हा गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो. - कोणत्या परिस्थितीमध्ये ‘सरोगसी’चा पर्याय उपलब्ध होतो- जर गर्भपात पुन्हा पुन्हा होत असल्यास- गर्भाशय कमकुवत असेल किंवा आणखी काही समस्या असतील- गर्भाशयाची निर्मिती जन्मत:च झालेली नसेल - तीनवेळापेक्षा अधिक वेळा उपचार अयशस्वी झाले असतील- गर्भाशयाला टीबीचा आजार असेल- कोणतीही अशी समस्या ज्यामुळे गर्भधारणा करणे अशक्य असेल किंवा धोकादायक असेल.

सरोगेट माता कोण बनते ?

- सरोगेट मातेचे वय २५ ते ३५ असावे - सरोगसी महिलेचे वय हे २३ ते ५० आणि पुरुषाचे वय २६ ते ५५ दरम्यान असावे. - सरोगेट माता विवाहित असावी व तिला स्वत:चे एक मूल देखील असावे.- कोणतीही महिला फक्त एकदाच सरोगेट माता होऊ शकते.- हे काम कमाईचे साधन न मानता, समोरच्याला मदत करण्याच्या हेतू असावा

टॅग्स :Medicalवैद्यकीय