शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सूरज शर्मा यांचा सलग १२८ तास गायनाचा महाविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:07 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त व नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सलग १२८ तास गायनाचा नवा विक्रम नागपूरचे तरुण गायक सूरज शर्मा यांनी रचला. या गायनाचा महापराक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपुरात १०५ तास सलग गायनाचा विक्रम नोंदविण्यात आला होता.

ठळक मुद्देगिनीज बुक ऑफ रेकॉर्डर्सचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त व नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सलग १२८ तास गायनाचा नवा विक्रम नागपूरचे तरुण गायक सूरज शर्मा यांनी रचला. या गायनाचा महापराक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपुरात १०५ तास सलग गायनाचा विक्रम नोंदविण्यात आला होता.युथ वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित या उपक्रमाला २३ फेब्रुवारीला सकाळी ११.४६ वाजता सुरुवात झाली. २६ फेब्रुवारीला दुपारी सलग ७५ तास पूर्ण झाले होते. त्यानंतर प्रकृती खालवली असताना तातडीने औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर गायक शर्मा यांनी नव्या जोमाने पुन्हा गायनास सुरुवात केली होती. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी सलग गायनाचे १२८ तास पूर्ण करीत नवा विक्रम रचला आहे. त्यानंतर सूरजला तातडीने खासगी इस्पितळात हलविण्यात आले. शुक्रवारी त्याला सुटी देण्यात आली. सध्या त्याची प्रकृती बरी असल्याचे युथ वेल्फेअर असोसिएशनचे सचिव व उपक्रमाचे आयोजक मनीष पाटील यांनी सांगितले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्ला येत्या १५ दिवसांत त्याचा व्हिडीओ व आवश्यक दस्तावेज पाठविले जाईल, असेही पाटील म्हणाले.गायक सूरज शर्माने देशभक्ती गीतांसोबत नवीन व जुनी गीतेही सादर केली. प्रत्येक चार तासानंतर २० मिनिटांच्या ब्रेकमध्ये डॉक्टरचे पथक शर्मा यांच्या प्रकृतीची तपासणी करीत होते. डॉ. विद्यानंद गायकवाड व डॉ. इरफान अहमद हे त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. पहिल्या दिवसापासून सूरजच्या चारही बहिणी कुटुंबीयांसह इंदोरा चौकातील आयनॉक्स मॉल येथे उपस्थित राहून भावाला प्रोत्साहित करीत होत्या. शर्मा यांचा उत्साह वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी झाले होते.चार हजारांपेक्षा नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्पया विक्रमादरम्यन नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे आवाहन केले जात होते. यामुळे सहा दिवसांमध्ये चार हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा अर्ज भरून संकल्प केला.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर