शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

घराण्यांच्या संमिश्रतेने रंगलेली सुरेल मैफिल

By admin | Updated: June 16, 2014 01:11 IST

पं. उल्हास कशाळकर म्हणजे सौंदर्यपूर्ण गायकीचे उत्तम उदाहरण. मूळ वैदर्भीय गायक असल्याने स्वाभाविकपणे येथल्या रसिकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या दमदार गायकीचा अनुभव

अनुभूती सांस्कृतिक महोत्सव : पं. उल्हास कशाळकर यांचे गायन नागपूर : पं. उल्हास कशाळकर म्हणजे सौंदर्यपूर्ण गायकीचे उत्तम उदाहरण. मूळ वैदर्भीय गायक असल्याने स्वाभाविकपणे येथल्या रसिकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या दमदार गायकीचा अनुभव रसिकांना आनंद देणारा आहे. पं. उल्हास कशाळकर यांचे गायन ऐकण्यासाठी श्रोते नेहमीच तयार असतात, याचा प्रत्यय आज अनुभूतीच्या सांस्कृतिक महोत्सवात आला. पं. कशाळकर यांच्या कसदार गायनाने ही मैफिल रंगली. गायकीच्या विविध घराण्यांची संमिश्रता त्यांचे गायन अधिक गहिरे करणारी आणि मैफिलीत सौंदर्य ओतणारी होती. हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर येथे पार पडला. पं. कशाळकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायक म्हणून परिचित आहेत. ग्लाव्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या गायकीचे वैविध्य त्यांच्या गायनात रसिकांना आनंद देणारे आहे. नागपूर जिल्ह्यातील पांढरकवडा येथे त्यांचा जन्म झाला. त्यामुळे ते नागपूरकर रसिकांना अधिक जवळचे वाटतात. त्यांचे प्रारंभिक संगीताचे शिक्षण त्यांचे वडील नागेश कशाळकर यांच्याकडे झाले. या दरम्यान त्यांना राजाभाऊ कोगजे, प्रभाकरराव खर्डेनवीस यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर राम मराठे यांच्याकडे आग्रा घराण्याचे आणि गजाननबुवा जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली. पं. उल्हासजींच्या गायनात जयपूरच्या गायकीचे निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रय विष्णु पलुस्कर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व यांचा प्रभाव आहे. हे सारेच रसिकांसाठी विलक्षण सुरेलतेचा अनुभव देणारे आहे. पंडितजींनी आपल्या गायनाचा प्रारंभ राग रामकलीने केला. रामकली रागात त्यांनी विलंबित मोठा ख्याल आणि द्रुत लयीत छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर सर्वांगसुंदर हिंडोल बहार रागाला त्यांनी प्रारंभ केला. रागाचे सौंदर्य हळुवार उलगडत त्यांनी वैविध्यपूर्णतेने रागाची मांडणी करताना दोन बंदीशी सादर केल्या. यानंतर ‘जोहार माय बाप जोहार...’ हे नाट्यपद सादर करुन त्यांनी रसिकांची दाद घेतली. ही मैफिल पंडितजींच्या नावाचीच होती. ती संपूच नये असे वाटत असताना पंडितजींनी भैरवीला प्रारंभ केला. गोडी अपूर्णतेची ठेवत ही मैफिल संपली. त्यांना संवादिनीवर सुधीर नायक यांनी साथसंगत केली. तबल्यावर पं. सुरेश तळवलकर यांनी संगत केली. याप्रसंगी पं. तळवलकर यांनी स्वरांची, संगीताची आध्यात्मिक अनुभूतीचा आलेला प्रत्यय सांगितला. पं. कशाळकरांना परिमल कोल्हटकर, श्रेयस तांबे यांनी गायनात साथ केली. या मैफिलीनेच अनुभूती महोत्सवाची सांगता झाली. (प्रतिनिधी)