शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 00:20 IST

उशिरा तिकीटवाटप करणे ही काँग्रेस नेतृत्वाची चूक

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मजबूत चेहरा द्यायला हवा होता. असे झाले असते तर निकालांचे चित्र वेगळे असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार व माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. सोमवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

निवडणुकांना सामोरे जायच्या वेळी आघाडीला प्रभावी चेहरा आवश्यक होता. दुर्दैवाने तसे झाले नाही. यासंदर्भात वेळीच पुढाकार अपेक्षित होता. नागपूर शहरात मुख्यमंत्री लढत असतानादेखील काँग्रेसने वेळेवर उमेदवार घोषित केले. भाजपच्या बालेकिल्ल्यात तरीदेखील काँग्रेस उमेदवारांनी जोरदार टक्कर दिली व सहापैकी दोन जागांवर विजय मिळविला. आम्हाला प्रचार करायला १० ते १२ दिवसच मिळाले. जर दीड महिना अगोदर नाव जाहीर केले असते तर आम्ही मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचू शकलो असतो व मोठा फरक पडला असता. यावेळी झालेली चूक काँग्रेस नेतृत्वाकडून पुढील वेळी सुधारली जाईल अशी अपेक्षा आहे. आम्ही ही चूक सुधारण्यासाठी भाग पाडू, असे प्रतिपादनदेखील आशिष देशमुख यांनी केले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आणखी मोठे पद देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. मी कधीही सत्तेच्या मागे नव्हतो व पुढील निवडणुकीत मी परत मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात उभा राहील, असेदेखील ते म्हणाले. यावेळी दक्षिण नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव हेदेखील उपस्थित होते.गटबाजीत ऊर्जा वाया गेलीदरम्यान, आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे एक पत्रकदेखील जारी केले. यातदेखील त्यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेचा कौल हा सत्ताधीशांच्या विरोधातील आहे. परंतु काँग्रेस पक्ष विखुरलेला व नेते सैरभैर झालेले होते. त्यामुळे याअगोर व आतादेखील सत्ता मिळवू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक मुद्यांवर आपले दुर्लक्ष झाले. गटबाजीत ऊर्जा वाया घालवली. केवळ निवडणूक ते निवडणूक मतदारांना भेटल्याने फारसे काही हाताला लागत नाही. मतदारांनी यावेळी आपल्यावर विश्वास टाकला आहे व यात आपण चुकलो तर भविष्यात अडचणीत येऊ, असे यात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस