शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महिला अधिकारांचे रक्षण करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:41 IST

व्यभिचाराशी संबंधित कायदा रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे विधी, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राशी जुळलेल्या महिलांनी स्वागत केले आहे.

ठळक मुद्देमान्यवरांनी दिल्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यभिचाराशी संबंधित कायदा रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे विधी, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राशी जुळलेल्या महिलांनी स्वागत केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकमतशी बोलताना त्यांनी न्यायालयाचा निर्णय महिलांचे स्वातंत्र्य व अधिकारांचे रक्षण करणारा असल्याचे मत व्यक्त केले. देशात अनेक कायदे वर्तमान काळात अन्यायकारक आहेत. त्यातीलच हा कायदा १८६० मध्ये तयार करण्यात आला होता व आजपर्यंत लागू होता. यावर निर्णय देताना न्यायालयाने काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले. त्यावरून निश्चितच हा कायदा महिलांचे स्वातंत्र्य, वैयक्तिक अधिकारांचे हनन करणारा होता. त्यामुळे शुक्रवारी दिलेला निर्णय हा स्वागतयोग्य असल्याच्या प्रतिक्रिया या मान्यवरांनी दिल्या.

वेळ वेगाने बदलत आहेअ‍ॅड. स्मिता सिंगलकर म्हणाल्या, काळ वेगाने बदलत आहे. भूतकाळ आणि आताच्या काळात मोठे अंतर आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लिंग समानता स्थापन करणाराच आहे. व्यभिचार कायदा विरोधात होता. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा अधिकार आत्मसन्मानाशी जुळला असल्याच्या न्यायालयाची प्रतिक्रिया महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.

कलम ४९७ हा भूतकाळअ‍ॅड. फौजिया हैदरी म्हणाल्या की, न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे वाचला नाही. मात्र माध्यमांमधून आलेल्या बातम्यानुसार न्यायालयाचा निर्णय अनेक महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष वेधणारा आहे. व्यभिचार कायद्याचे कलम ४९७ हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया न्यायालयाने दिली आहे. हे कलम अतार्किक आणि भूतकाळाची गोष्ट आहे.

महिला हितांची रक्षा करणे गरजेचेप्रा. डॉ. उषा साकुरे म्हणाल्या की, आज महिला अधिकार व स्वतंत्रतेवर बोलले जाते. सोबतच लैंगिक समानतेचाही पुरस्कार केला जातो आहे. अशावेळी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महिलांना जीवन जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करणारा आहे.

तीन तलाक नंतर हा मोठा निर्णयअ‍ॅड. कंचन शर्मा म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी महिला सशक्तीकरणाच्या बाजूने महत्त्वाचे निर्णय दिले आहे. हा निर्णयही त्यातीलच आहे. आता पत्नीला संपत्तीत अधिकारासोबतच अर्धांगिनी संबोधण्याची संधी मिळेल. तीन तलाकनंतर सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा मोठा निर्णय आहे. या निर्णयाचे स्वागत आहे.

प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकारतिरपुडे इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीच्या प्रा. श्रुती ढबाले ठाकरे म्हणाल्या की, आज प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. यापूर्वीही न्यायालयाने महिला हितांचे रक्षण करणारे महत्त्वाचे निर्णय दिले आहे. आज खरी गरज आहे ती, त्यांच्या अधिकारांच्या रक्षणाची. असे अनेक कायदे आहेत, जे संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराचे हनन करणारे आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय