शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘राफेल’ चौकशी दाबण्यासाठीच ‘सीबीआय’चे महाभारत : यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:15 IST

‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देदेशाची अवस्था ‘बनाना रिपब्लिक’सारखी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा, ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. ‘सीबीआय’मध्ये झालेल्या खेळखंडोब्याने हे दाखवून दिले आहे की देशात कायद्याचे राज्य राहिलेलेच नाही. पंतप्रधान किंवा कॅबिनेट सीबीआय प्रमुखांना पदावरून काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. केंद्र सरकारच्या अशा भूमिकांमुळे ‘सीबीआय’सारख्या संस्थांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. देशाला केंद्र सरकारने ‘बनाना रिपब्लिक’ बनविण्याचेच प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी लावला.‘राफेल’ प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात अरुण शौरी, प्रशांत भूषण आणि इतर काही लोकांनी कागदोपत्री पुराव्यांसह सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी ती तक्रार स्वीकारली. तसेच तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना पुरावा म्हणून ग्राह्य धरायचे का याबाबत मत मागण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना विचारणा केली. यामुळेच सरकारची नाराजी त्यांना झेलावी लागली, असे यशवंत सिन्हा म्हणाले.राकेश अस्थाना हे कठपुतळीयावेळी खा.संजय सिंह यांनी राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी राकेश अस्थाना हे पंतप्रधान आणि अमित शाह यांच्या गोतावळ्यातील आहेत. ‘सीबीआय’मधील प्रकरणे आपल्या पद्धतीने हाताळणे आणि काही प्रकरणे दाबण्यासाठी अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली होती. संचालकपदाची प्रभारी जबाबदारी नागेश्वर राव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र ते भ्रष्ट अधिकारी आहेत, असा दावा त्यांनी केला.अजित डोवाल यांना इतके अधिकार का ?यावेळी यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरदेखील टीका केली. अजित डोवाल यांच्यासारख्या प्रशासकीय व्यवस्थेतील व्यक्तीला इतके अधिकार देणे हे लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यांना केंद्राने ‘सुपर इंटेलिजन्ट स्टार’ बनविले आहे, असे सिन्हा म्हणाले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाRafale Dealराफेल डील