शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:25 IST

शहर वाढत आहे तशी रुग्णांची संख्याही वाढत आहे. हृदयविकारापासून ते मूत्रविकारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परंतु अशा रुग्णासांठी मध्य भारतात केवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे.

ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयाचा पुढाकार :

पेडियाट्रिक सर्जरी ते प्लास्टिक सर्जरी विभाग असणारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर वाढत आहे तशी रुग्णांची संख्याही वाढत आहे. हृदयविकारापासून ते मूत्रविकारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परंतु अशा रुग्णासांठी मध्य भारतात केवळ सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे. आता यात मेयोच्या सुपर स्पेशालिटी विभागाची भर पडण्याची शक्यता आहे. या संदर्भातील एक प्रस्ताव नुकताच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला असून लवकरच याला मंजुरीही मिळणार आहे. विशेष म्हणजे, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मेयोने घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे.गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) दिवसेंदिवस व्याप वाढत आहे. या रुग्णालयात आवश्यक उपचार, तातडीच्या व गंभीर स्वरुपातील शस्त्रक्रिया होत असल्यातरी लहान मुलांवरील शस्त्रक्रिया (पेडियाट्रिक सर्जरी)होत नाही. ‘नेफ्रोलॉजी’, ‘युरोलॉजी’, ‘इन्डोक्रिनोलॉजी’ आदी अतिविशेषोपचार विभाग (सुपर स्पेशालिटी) औषधवैद्यकशास्त्र (मेडिसिन) विभागालाच हाताळावे लागतात तर गंभीर रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागते.येथे आधीच रुग्णांची गर्दी त्यात मेयोच्या रुग्णांची भर पडते. यामुळे रुग्णांची गैरसोय होते. विशेषत: उपचारात उशीर होतो. याची दखल मेयोच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली. तेवढ्यात तत्परतेने मेयो प्रशासनाने याला पाठबळ दिल्याने अतिविशेषोपचार विभाग सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला असून मंजुरीची प्रतीक्षा आहे.लहान मुलांच्या हृदयावर होणार शल्यक्रियामेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयशल्यचिकित्सा विभाग असला तरी येथे लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया होत नाहीत. परंतु शासनाची मंजुरी मिळाल्यास मेयोमध्ये ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभाग असणार आहे. या सोबतच, ‘नेफ्रोलॉजी’, ‘इन्डोक्रिनोलॉजी’, ‘युरोलॉजी’, ‘आॅन्कोलॉजी’ व ‘प्लास्टिक सर्जरी’ आदी विभाग सुरू करण्यात येईल.माजी विद्यार्थी मानद म्हणून देणार सेवाशहरात सुपर स्पेशालिटीच्या खासगी सेवेसाठी प्रसिद्ध असणाºया मेयोच्या माजी विद्यार्थ्यांनी गरीब रुग्णांना अतिविशेषोपचार मिळावा यासाठी पुढाकार घेतला असून ते मानद म्हणून सेवा देणार आहे. विशेष म्हणजे, या विशेषज्ञाचे १५०० रुपये मानधन वाढवून देण्याचा प्रस्तावही मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.रुग्णांसाठी फायद्याचेसुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. याचा एक भाग म्हणून मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यास रुग्णांना याचा मोठा फायदा होईल.-डॉ. अनुराधा श्रीखंडेअधिष्ठाता, मेयो