शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या शासकीय दंत  रुग्णालयामध्ये लवकरच सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम : अधिष्ठाता गणवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 20:27 IST

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे (डेंटल) अतिविशेषोपचार रुग्णालय हे केवळ रुग्णांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. नवेनवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विशेषत: विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. सुपर स्पेशालिटीमध्ये ‘ओरल इम्प्लांटलॉजी कोर्स’, डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटीक डेन्टीस्ट्री’ व ‘डिजिटल डेन्टीस्ट्री’ हे विभाग सुरू करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती डेंटलच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी दिली.

ठळक मुद्देडेंटलच्या सुवर्ण जयंती इमारतीचे आज उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे (डेंटल) अतिविशेषोपचार रुग्णालय हे केवळ रुग्णांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. नवेनवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विशेषत: विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. सुपर स्पेशालिटीमध्ये ‘ओरल इम्प्लांटलॉजी कोर्स’, डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटीक डेन्टीस्ट्री’ व ‘डिजिटल डेन्टीस्ट्री’ हे विभाग सुरू करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती डेंटलच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी दिली.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) सुवर्ण जयंती इमारतीचा कोनशिलाचे अनावरण शुक्रवारी सांयकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. अभय दातारकर व डॉ. वैभव कारेमोरे उपस्थित होते.डॉ. गणवीर म्हणाल्या, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा सुवर्ण जयंती महोत्सव नुकताच पार पडला. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेडिकलच्या २२०७२ चौरस फूट जागेवर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन व सुपर स्पेशालिटी रुग्णलायासाठी लागणाऱ्या निधीच्या प्रस्तावाला शासनाकडून लवकरच मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर लगेच बांधकामासाठी लागणाऱ्या २२ कोटीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. यातील पहिल्या टप्प्यातील निधी बांधकाम विभागाच्या तिजोरीतही जमा झाले.पाच मजल्याचे सुपर स्पेशालिटीडॉ. गणवीर म्हणाल्या, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या पुढाकारामुळेच सुपर स्पेशालिटीला मेडिकलची जागा मिळाली. या जागेवर सात मजल्याची इमारत प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात मात्र तळमजल्यासह पाच मजली इमारतीचे बांधकाम होईल.अद्ययावत सोयी उपलब्ध असतीलडॉ. गणवीर म्हणाल्या, सुवर्ण जयंती इमारतीत पदव्युत्तर अभ्यासक्रम प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या नावाखाली ‘अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग’ दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळण्यासाठी ‘सेंट्रल रिसर्च लेबॉट्रीज्’, ‘अ‍ॅडव्हान्स ई-लायब्ररी’, पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सेम्युलेटर लॅब’ असणार आहे.बीडीएसच्या १०० जागेसाठी प्रयत्नदंत महाविद्यालयाच्या ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ (बीडीएस) विषयासाठी सध्या ५० जागांना मंजुरी आहे. परंतु सुवर्ण जयंती इमारतीमुळे विविध सोयी उपलब्ध होणार आहेत. यामुळे या जागा वाढून १०० होण्याची शक्यता आहे, असेही डॉ. गणवीर यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर