शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीच्या ‘सुपर’ला कळलेच नाही सॅनिटरी पॅडचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 11:46 IST

मुंबईच्या महानगरपालिकेने आपल्या ३४५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सॅनिटरी पॅडचे महत्त्वच कळले नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिलाच प्रयोग फसलारुग्णालयातील सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सॅनिटरी पॅडविषयी समाजात असणाऱ्या गैरसमजांवर भाष्य करणारा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शनाचा वाटेवर आहे तर मुंबईच्या महानगरपालिकेने आपल्या ३४५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सॅनिटरी पॅडचे महत्त्वच कळले नसल्याचे वास्तव आहे. वर्षभरापूर्वी रुग्णालयाच्या वॉर्डावॉर्डातील महिलांच्या स्वच्छतागृहात लावलेले सॅनिटरी पॅडच्या वेंडिंग मशीन्स बंद पडल्या आहेत. यामुळे रुग्णांची कुचंबणा होत असून राज्यातील पहिलाच प्रयोग फसला आहे.भारतात ८८ टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी जुने फडके, काहीवेळा वर्तमानपत्र अशांसारख्या साधनांचा उपयोग करतात.परिणामी जवळजवळ ७० टक्के स्त्रियांना जननसंस्थेमध्ये संसर्ग होऊन त्यासंबंधीच्या रोगांना सामोरे जावे लागते. शिवाय हा विषय अत्यंत खासगी असल्याने त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते. विशेष म्हणजे रुग्ण असतानाही संकोचामुळे या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आजार आणखी गंभीर होण्याची शक्यता राहते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे ८० टक्के रुग्ण हे दारिद्र्य रेषेखालील असतात. यामुळे महिला रुग्णांना डॉक्टरांनी ‘सॅनिटरी पॅड’ वापरण्याची सूचना केली तरी पैशांअभावी ‘पॅड’ वापरले जात नाही. याची दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली. रुग्णांच्या सोयीसाठी ‘सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन’ उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आमदार प्रा. गिरीश व्यास यांना विनंती केली. आ. व्यास यांनी या मागणीला गंभीरतेने घेत निधी उपलब्ध करून दिला. यामुळे दहा ‘सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन’ विकत घेण्यात आल्या. गेल्या वर्षी या मशीन वॉर्डावॉर्डातील महिल्यांच्या स्वच्छतागृहात लागल्या. या मशीनसोबत वापरलेले ‘सॅनिटरी पॅड’ जाळण्याचे यंत्रही उपलब्ध करून देण्यात आले होते. यामुळे वापरलेल्या पॅडचा कचरा कुठेही दिसणार नव्हता. या ‘पॅड’चा खर्च रुग्णाला साधारण दोन रुपये येणार होता. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयातील हा पहिलाच प्रयोग होता. परंतु या मशीन लागल्यापासून काही सुरू होऊन बंद पडल्या तर काही सुरूच झाल्या नाही. रुग्णालयाच्या विशेष कार्य अधिकारी पद सांभाळलेल्या अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णालय प्रशासनाला ‘सॅनिटरी पॅड’चे महत्त्वच कळले नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य