शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भावर सूर्याचा कोप, अकाेला ४४ पार तर चंद्रपूर, अमरावतीचे तापमान ४३ च्यावर

By निशांत वानखेडे | Updated: April 7, 2025 18:55 IST

नागपूरलाही झळा : दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : एप्रिल महिना पुढे सरकताे तसा सूर्याचा प्रकाेपही वाढायला लागला आहे. विदर्भावर हा काेप अधिकच दिसून येत असून उन्हाच्या झळा अधिक तीव्र हाेत आहेत. साेमवारी अकाेल्याचे कमाल तापमान ४४.२ अंशावर पाेहचले, जे राज्यात सर्वाधिक हाेते. विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून ८ व ९ एप्रिल या पुढच्या दाेन दिवसात उष्ण लाटांचा सामना करावा लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

अकाेल्यात साेमवारी एका अंशाची वाढ हाेत तापमान ४४.२ अंशावर पाेहचले, जे सरासरीपेक्षा ४ अंशाने अधिक आहे. त्या खालाेखाल चंद्रपूर व अमरावतीत ४३.६ अंशाची नाेंद झाली. ब्रम्हपुरीचा पारा ४३.८ अंशावर गेला. दुसरीकडे नागपुरात अंशत: वाढ हाेत पारा ४२.४ अंशावर पाेहचला. वर्धा, यवतमाळातही तापमान ४२ अंशावर हाेते. गडचिराेली ४१ व गाेंदिया ४० अंश नाेंदविण्यात आले. सर्वच जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने अधिक चढले आहे. रात्रीच्या तापमानातही किंचित वाढ नाेंदविण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस कमाल तापमानात २ ते ४ अंशाची वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यातही ८ व ९ एप्रिल राेजी विदर्भात तापमान वाढून उष्ण लाटांच्या स्थितीचा सामना करावा लागेल. सध्या गुजरातचे साैराष्ट्र, कच्छ, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली व मध्य प्रदेशातही उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर वातावरणात पुन्हा बदल हाेत ढगाळ वातावरण व पुन्हा अवकाळी पावसाची स्थिती निर्माण हाेईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Temperatureतापमानweatherहवामान अंदाजAkolaअकोलाchandrapur-acचंद्रपूरnagpurनागपूरVidarbhaविदर्भ