शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

सुनील केदार समर्थकांचा पत्ता कट, वासनिकांवर रोष; गटबाजी तीव्र होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 07:45 IST

Nagpur News केदारांविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे केदार समर्थक कमालीचे दुखावले आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्तक्षेपामुळेच गेम झाला, असा केदार समर्थकांचा उघड आरोप आहे.

ठळक मुद्देजुन्या कार्यकारिणीत प्रदेश सचिव राहिलेले अतुल कोटेचा व मुजीब पठाण यांना वगळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रदेश काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत क्रीडा मंत्री सुनील केदार समर्थकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. केदार यांनी शिफारस केलेल्या एकालाही यादीत स्थान देण्यात आलेले नाही. उलट केदारांविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे केदार समर्थक कमालीचे दुखावले आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्तक्षेपामुळेच गेम झाला, असा केदार समर्थकांचा उघड आरोप आहे. (Sunil Kedar's supporters cut off address, anger at Wasnik; Signs of factionalism intensifying)

प्रदेश काँग्रेसच्या यादीत समर्थकांना स्थान मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे फिल्डिंग लागली होती. नेत्यांनी तशी यादी पटोलेंकडे सादर केली होती. प्राप्त माहितीनुसार केदार यांच्याकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, कामठी विधानसभेत लढलेले जि.प. चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, युवक काँग्रेसच्या रामटेक लोकसभेच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत, नागपूर विभागाचे बूथ संघटक प्रकाश वसु यांच्यासह आणखी काही नावे देण्यात आली होती.

प्रदेश काँग्रेसच्या सूत्रानुसार केदारांनी दिलेली बहुतांश नावे प्रदेश काँग्रेसकडून दिल्लीत पाठविण्यात आली. मात्र, दिल्लीत अंतिम शिक्कामोर्तब करताना ही नावे वगळण्यात आली. या सर्व घटनाक्रमामागे वासनिक यांचा हात असल्याचा केदार समर्थकांचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखविण्यात आली आहे. केदार यांनी मात्र स्वत: या मुद्यावर मौन साधले आहे.

पुरवणी यादी येणार

- प्रदेश काँग्रेसच्या यादीत अनेक महत्वाच्या नेत्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे धुसफूस वाढली आहे. महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका तोंडावर आहेत. या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये म्हणून लवकरच निवडक नेत्यांची एक पुरवणी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसAshish Deshmukhआशीष देशमुख