शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केदारांचा एमआरआय नॉर्मल, सीटी अँजिओग्राफीसाठी लागणार वेळ!

By सुमेध वाघमार | Updated: December 24, 2023 18:14 IST

या तपासणीचा अहवाल 'नॉर्मल' आल्यावरच त्यांची मेडिकलमधून सुटी होण्याची शक्यता आहे.

नागपूर : मेडिकलच्या आयसीयूमध्ये भरती असलेले माजी मंत्री सुनील केदारांचा एमआरआयचा अहवाल रविवारी नॉर्मल आला. परंतु क्रिएटीनीन वाढल्याने 'सीटी अँजिओग्राफी' पुढे ढकलण्यात आली. या तपासणीचा अहवाल 'नॉर्मल' आल्यावरच त्यांची मेडिकलमधून सुटी होण्याची शक्यता आहे.       जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने केदार यांना पाच वर्षांची कारवासाची शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी  वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मेडिकलमध्ये आणण्यात आले. येथे त्यांना घशाचा संसर्ग, मायग्रेनचा त्रास असल्याचे आणि ईसीजीमध्ये 'हार्ट रेट' कमी असल्याचे आढळून आले. त्यांना वॉर्ड क्र.५२ या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. 

शनिवारी सुपर स्पेशालिट हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञानी त्यांची तपासणी करून सीटी अँजिओग्राफीचा सल्ला दिला. रविवार सुटीचा दिवस असतानाही ही तपासणी होणार होती. परंतु त्यापूर्वी करण्यात येणाऱ्या तपासणीत क्रिएटीनीन वाढल्याचे आढळून आले. यामुळे ही तपासणी पढे ढकलण्यात आली. मायग्रेनचा निदानासाठी त्यांचा एमआरआय करण्यात आला असता, तो नॉर्मल आला. 

'एक्स-रे'मध्ये त्यांच्या छातीत कफ असल्याचेही दिसून आले. यामुळे रविवारची रात्रही त्यांची मेडिकलमध्ये गेली. एकूणच मेडिकल प्रशासन शक्य तितक्या लवकरच विविध तपासण्या, आजाराचे निदान व उपचार करून त्यांना सुटी देण्याचा प्रयत्नात असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारnagpurनागपूर