शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केदारांवर याचिका मागे घेण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:07 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा नाकारल्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्यातील आरोपी आमदार सुनील केदार यांच्यावर सहकारी संस्था कायद्यातील दुरुस्तीविरुद्धची याचिका मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

ठळक मुद्देहायकोर्ट : सहकार कायद्यातील दुरुस्तीला दिले होते आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा नाकारल्यामुळे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्यातील आरोपी आमदार सुनील केदार यांच्यावर सहकारी संस्था कायद्यातील दुरुस्तीविरुद्धची याचिका मागे घेण्याची नामुष्की ओढवली. त्यांनी यासंदर्भात गुरुवारी अर्ज दाखल करून न्यायालयाच्या अनुमतीने याचिका मागे घेतली.सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० मधील ८८ व्या कलमात दुरुस्ती केली आहे. सुधारित कायदा २६ एप्रिल २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. जुन्या कायद्यातील कलम ८८ अनुसार सहकारी संस्थेतील नुकसान मूल्यांकनाची व आरोपींवर जबाबदारी निश्चित करण्याची चौकशी संबंधित आदेशापासून दोन वर्षांत पूर्ण करणे अनिवार्य होते. त्यानंतर ठोस कारणावरून कमाल सहा महिन्यांची मुदत वाढवता येत होती. ही दुसरी तरतूद दुरुस्तीद्वारे रद्द करण्यात आली आहे. सुधारित तरतुदीनुसार, सरकारला निबंधकाच्या अहवालावरून किंवा स्वत:हून लेखी कारण देऊन चौकशीचा काळ आवश्यकतेनुसार वेळोवेळी वाढवून देता येणार आहे. नवीन कायदा लागू होण्यापूर्वी प्रलंबित असलेल्या चौकशींनाही ही तरतूद लागू करण्यात आली आहे. केदार यांचा यावर आक्षेप होता. कोणताही कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यात केदार यांची चौकशी केली जात आहे हे येथे उल्लेखनीय. न्यायालयात केदार यांच्यातर्फे अ‍ॅड. चारुहास धर्माधिकारी तर, सरकारतर्फे अ‍ॅड. सागर आशिरगडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSunil Kedarसुनील केदार