शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी सावली सोडणार साथ : १२.१० वाजता डोक्यावर येईल सूर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:26 IST

अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही.

ठळक मुद्दे राज्यात २८ पर्यंत अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही.खगोलशास्त्राच्या भाषेत याला ‘शून्य सावली दिवस’ (झिरो शॅडो डे) असे संबोधले जाते. खगोलशास्त्र तज्ज्ञानुसार येत्या २६ मे रोजी भर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी हा शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. जिल्ह्यात २४ ते २८ मे या काळात शून्य सावलीचा अनुभव येईल. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली, असे वाटते. ही खगोलीय घटना रोमांचकारी अनुभवच आहे. तज्ज्ञांच्यानुसार पृथ्वीचा धु्रव २३.५ अंश उत्तरेकडे कलल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. त्यामुळे सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे २३.५ अंश आणि उत्तरेकडे २३.५ अंश भ्रमण करताना दिसतो. एखाद्या अंशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येते. त्यावेळी कोणत्याही वस्तूची सावली दुपारी पडत नाही. सूर्याचा आंशिक कोन मोठा असल्याने एकाच वर्षी दोनदा शून्य सावली अनुभवता येते. वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. मे महिन्यात ३ ते ३० मेदरम्यान १५ ते २२ उत्तर अक्षांशावर महाराष्ट्रात शून्य सावली दिवस घडतो. राज्यात २० ते ३० मेदरम्यान आणि १६ जुलै व ५ ऑगस्टदरम्यान शून्य सावली दिवसाचा अनुभव येईल. मात्र या काळात पावसाळा राहत असल्याने ढगाळ वातावरणामुळे ते पाहता येत नाही. मात्र मे महिन्यात हा अनुभव घेता येतो. पृथ्वीवर मकरवृत्त दक्षिणेकडच्या भागात आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्यावर येत नाही. पण दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर आल्याचा अनुभव येतो व शून्य सावलीचा अनुभव मिळतो.पूर्वी आपली पृथ्वी सपाट आहे, अशी मान्यता होती. मात्र शून्य सावलीच्या प्रयोगामुळे पृथ्वी सपाट नसून गोल आहे व ती आपल्या अक्साभोवती फिरते, हे गृहितक सिद्ध करण्यात यश आले. हे यामागचे वैज्ञानिक महत्त्व आहे.रमण विज्ञान केंद्रात शून्य सावलीचा प्रयोगमुलांना झिरो शॅडो डेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा व त्यामागचे विज्ञान समजावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंद्वारे ही घटना प्रत्यक्ष दाखविण्यात येणार आहे. ११.३० वाजतापासून १२.१० पूर्वी, त्यावेळी आणि त्यानंतर काय फरक दिसतो, हे प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. शून्य सावलीचा अनुभव केवळ नागपुरात घेता येणार आहे. त्यामुळे एक मीटर रॉडच्या मदतीने नागपूर, भोपाळ आणि दिल्ली येथे एकाचवेळी काय परिस्थिती असेल आणि पडणाऱ्या सावलीची लांबी किती असेल, याचा प्रयोग दाखविण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे तांत्रिक अधिकारी महेंद्र वाघ यांनी दिली.

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसnagpurनागपूर