शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नवतपामध्ये सूर्य आग ओकणार : शनिवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:01 IST

शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देतापमान ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.शहरात शुक्रवारी ४६ डिग्री तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत तापमान ०.२ डिग्रीने घटले, पण ही अत्यल्प घसरण दिलासादायक ठरली नाही. विदर्भातील तापमानात ४६.६ डिग्रीसह चंद्रपूर पहिल्या तर, नागपूर दुसऱ्या स्थानावर राहिले. ब्रह्मपुरीत ४५.८, वर्धेत ४५, गडचिरोलीत ४४.८, अकोल्यात ४४.४, गोंदियात ४४, अमरावतीत ४३.६, यवतमाळात ४३.५, वाशिम येथे ४३ तर, बुलडाणामध्ये ४१ डिग्री तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात बुधवारी ४६ तर, गुरुवारी ४६.२ डिग्री तापमान होते. गेल्या ३० एप्रिल रोजी सर्वाधिक ४६.३ डिग्री तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने नवतपामुळे रेड अलर्ट जारी करून चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती व यवतमाळ येथे अचानक पारा चढेल असा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे.एसी, कुलर बिनकामाचेसध्या एसी व कुलर बिनकामाचे झाले आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कुलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागते. एसीची क्षमताही कमी पडत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत.रेड अलर्टचा अर्थतापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ डिग्रीने जास्त राहण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट जारी केला जातो. या काळात चार-पाच दिवस समान परिस्थिती कायम राहते. ऑरेंज अलर्टमध्ये पारा सामान्यपेक्षा ३ ते ४ डिग्री जास्त असतो.दुपारी बाहेर पडू नकाउन्हात जायचे असल्यास पूर्ण अंग झाकल्या जाईल असे सुती कपडे घाला. डोके व चेहऱ्याला सुती कपडा बांधा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, त्यांनी दुपारी १२ ते ४.३० पर्यंत घराबाहेर पडण्यास मनाई केली व ताक, लिंबू सरबतसह भरपूर पाणी पिण्यास सांगितले.

 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात