शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘एक सुरों का काँरवा’ रंगलेली सुरेल सायंकाळ

By admin | Updated: June 22, 2014 01:04 IST

aशास्त्रीय संगीतातील सुमधुर राग-रागिण्यांचा परिचय सर्वसामान्य रसिकांना करून देणाऱ्या ‘एक सुरों का काँरवा...’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संगीत कला अकादमीतर्फे आज करण्यात आले.

संगीत कला अकादमी : शास्त्रीय रागसंगीतावर आधारित गीतांचे सादरीकरण नागपूर : शास्त्रीय संगीतातील सुमधुर राग-रागिण्यांचा परिचय सर्वसामान्य रसिकांना करून देणाऱ्या ‘एक सुरों का काँरवा...’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संगीत कला अकादमीतर्फे आज करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. कार्यक्रमात राग भैरव ते भैरवीवर आधारित अमिट सिनेगीतांचे सादरीकरण तयारीने करण्यात आले. या कार्यक्रमाने नागपूरकर दर्दी रसिकांची एक सायंकाळ सुरेल झाली. शास्त्रीय संगीतातील प्रत्येक राग सादरीकरण हे रागसमय चक्रानुसारच करण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्या क्रमानुसार गायकाकडून सादर होणाऱ्या शब्दस्वरांचा हा श्रवणीय काँरवा होता. शास्त्रीय गायक विनोद वखरे यांचे संगीत संयोजनात या कार्यक्रमाची संकल्पना यशश्री भावे - पाठक यांची होती. विनोद वखरे, यशश्री भावे - पाठक, मंजिरी वैद्य, शशी वैद्य या गायकांनी यावेळी गीते सादर केली. पहाटेच्या शितल वातावरणाला अनुरुप अशा राग भैरवमधील ‘जागो मोहन प्यारे...’ हे गीत यशश्रीने सुस्वरात सादर करुन रसिकांची दाद घेतली. विनोद वखरे आपल्या शास्त्रीय गायकीसाठी रसिकांमध्ये प्रिय आहेत. त्यांनी राग अहिर भैरवमधील ‘पुछो ना कैसे मेने रैन बितायी...’ हे गीत भावपूर्णतेने सादर केले. मंजिरीने राग बिलावलमधील ‘पिया तोसे नैना लागे रे...’ हे गीत तयारीने सादर केले. गुणी गायक शशीने राग गोरखकल्याणमधील ‘सुरमयी शाम...’ हे गीत हळुवारपणे सादर करून ही सायंकाळ स्वरांच्या अभिषेकाने चिंब केली. विनय शुक्ला हे अतिथी गायक होते. यानंतर ‘नैनो मे बदरा छाये..., मधुबन मे राधिका नाचे रे..., साथी रे भूल ना जाना मेरा..., दिल के झरोको मे तुझको छुपाकर.., ’ आदी मारवा, हमीर, कलावती, केदार, शिवरंजनी, यमन रागातील गीते सादर करण्यात आली. रागदारीच्या संगीताने या कार्यक्रमात रंगत वाढविली. नासिरभाई यांचे निवेदन होते. गायकांना गोविंद गडीकर, महेंद्र ढोले, श्याम ओझा, सुभाष वानखेडे, तुषार विघ्ने, प्रसन्न वानखेडे, अशोक टाकलवार यांनी सहसंगत केली. कार्यक्रमाला किशोर वानखेडे, नीलिमा बावने, विश्वास चकमलवार, अरविंद कोमावार, अतुल यमसनवार, विनय शुक्ला, हरि मुजुमदार, प्रकाश एदलाबादकर, नंदू अंधारे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)