शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सुर्याने आग ओकली, पारा पोहोचला ४६.७ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:59 IST

नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.

ठळक मुद्देविदर्भाचे काही जिल्हे ‘रेड अलर्ट’वर : चंद्रपूर ४७.८, वर्धा ४७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.मंगळवारची उन्हाळ्यातील सर्वात गरम दिवस म्हणून नोंद करण्यात आली. आगामी २४ तास नागपुरकरांसोबतच विदर्भातील काही जिल्ह्यात हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे पारा सामान्य पेक्षा पाच अंश वर जाऊ शकतो. मंगळवारी शहराचे तापमान सामान्यपेक्षा ३.५ अंश वर राहिले. नागपुरात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. नवतपाच्या राहिलेल्या दिवसातही उन्हापासून दिलासा मिळण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. सातत्याने उन्हाचा प्रकोप सुरुच राहणार आहे. नागपुरात सकाळी ९ वाजेपासूनच गरम हवा सुरु झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. दुपारी १२ पासून ४.३० पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. इतर दिवसांपेक्षा दुपारी रस्त्यावर कमीत कमी वाहने पाहावयास मिळाली. हिट अ‍ॅक्शन प्लॉन नुसार शहराच्या अनेक चौकात ग्रीन नेट लावण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी महापालिकेच्या वतीने हिट अ‍ॅक्शन प्लॉनच्या नावावर काहीच करण्यात आले नाही. सामाजिक संस्थांनी प्याऊची व्यवस्था केली. उद्याने खुले ठेवण्याचे निर्देश होते. परंतु बहुतांश उद्यानांच्या प्रवेशद्वारावर कुलुप लावलेले दिसले. ट्राफिक सिग्नलवर थांबण्याची वेळ आली तेंव्हा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. दुपारच्या वेळी वाहतुक कमी राहत असल्यामुळे सिग्नल बंद ठेवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.४८ तासात ७.९ अंशाने तापमानात वाढनागपूर शहराच्या कमाल तापमानात मागील ४८ तासात ७.९ अंशाने वाढीची नोंद करण्यात आली. वादळ आणि पावसामुळे २७ मे रोजी कमाल तापमान ३८.८ अंशावर पोहोचले होते. परंतु दोन दिवसात पाऱ्याने उन्हाळ्यातील उच्चांक गाठून ४६.७ वर पोहोचला.भरपूर पाणी प्या, शरीराला झाकाडॉक्टरांनी सल्ला दिला आहे की दुपारी घरातून बाहेर पडण्याचे टाळा. जर बाहेर पडायचे असल्यास भरपूर पाणी प्यावे. शरीराला पूर्णपणे झाकुन घ्यावे. सुती कपडे घालावेत. डोके पुर्णपणे झाकलेले असणे आवश्यक आहे. हेल्मेटच्या वापरामुळे उन्हाच्या संपर्कात येण्यापासून वाचता येऊ शकते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नये. निंबु पाण्याचे सेवन करणेही फायद्याचे आहे.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर