शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूू : नागपूर विभागात ३०४ रुग्ण व २३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:32 IST

उन्ह वाढत असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूर विभागांतर्गत येण्याऱ्या सहा जिल्ह्यात आतापर्यंत ३०४ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूचा आकडा २३ वर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर शहरात झाली आहे. यामुळे खबरदारीचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक मुद्देशहरात २०१ रुग्ण, १४ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्ह वाढत असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूर विभागांतर्गत येण्याऱ्या सहा जिल्ह्यात आतापर्यंत ३०४ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूचा आकडा २३ वर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर शहरात झाली आहे. यामुळे खबरदारीचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.उन्हाळ्याला सुरुवात झाली तरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. हीच लक्षणे स्वाईन फ्लूची असल्याने अनेक जण याला सुरुवातीलाच गंभीरतेने घेत नाही. जेव्हा आजाराची गुंतागुंत वाढतेच तेव्हाच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. यामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नागपूर शहरात जानेवारी ते ५ एप्रिलपर्यंत २०१ रुग्ण आणि १४ मृत्यूची नोंद झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये २१ रुग्ण व दोन बळी गेले आहेत. वर्धा जिल्ह्यात पाच रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात चार रुग्ण, भंडारा जिल्ह्यात चार रुग्ण एक मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात तीन रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात सहा रुग्ण एक मृत्यूची नोंद आहे. मंडळाबाहेरील जिल्ह्यात, अमरावती येथे २३ रुग्ण चार मृत्यू, अकोला येथे दोन रुग्ण तर यवतमाळ येथे दोन रुग्ण एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याबाहेरील रुग्णांमध्ये मध्यप्रदेशातील ३० तर पश्चिम बंगालमधील एक रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत शहरात नऊ रुग्ण व एक मृत्यू तर नागपूर ग्रामीणमध्ये पाच रुग्ण व एक मृत्यू आहे.मेडिकलचा वॉर्ड क्र. २५ रुग्णसेवेतशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वॉर्ड क्र. २५चे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने आता पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण या वॉर्डात ठेवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या चार रुग्ण उपचार घेत आहेत. यात शुक्रवारी आणखी दोन महिला रुग्णांची भर पडली आहे. तर, शहरातील ११ खासगी इस्पितळांमध्ये १९ रुग्ण उपचार घेत आहेत.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य