कन्हान : वृद्धाने शेतातील झाडाच्या फांदीला दाेरी व दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री (ता. पारशिवनी) येथे मंगळवारी (दि. २६) सकाळी घडली.
हरिदास साेमकुवर (७०, रा. पाटीलनगर, कांद्री, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. हरिदास मंगळवारी सकाळी कुणालाही न सांगता घराबाहेर पडले. ते घरी आढळून न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला. दरम्यान, ते घराच्या आवारातील पेरूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी दाेरी व दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कन्हान येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार सहारे करीत आहेत.