शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 11:03 PM

सीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या घरी खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देकारण अस्पष्ट : कामठी शहरातील घटनासीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : सीए फाऊंडेशनच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या घरी खोलीत छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे मूळ कारण कळू शकले नाही. ही घटना कामठी शहरात सोमवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सुजेश राजेश कनोजिया (२२, रा. स्वामी विवेकानंद नगर, हमालपुरा, कामठी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सुजेश हा नागपूर येथे सीए फाऊंडेशनचे शिक्षण घेत होता. त्याला सोमवारी शिकवणीसाठी मुंबईला जावयाचे होते. दुपारी जेवण केल्यानंतर तो विश्रांती करण्यासाठी खोलीत केला. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने आईने त्याला आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने तिने दार ठोठावले. त्याचाही उपयोग न झाल्याने तिने जोरात धक्का देत दार उघडले.तेव्हा तिला सुजेश छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने आरडाओरड करताच शेजारी धावून आले. त्यांनी सुजेशला खाली उतरवून जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्याने सदर पाऊल का उचलले, हे कळायला मार्ग नाही. या प्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी