शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अभियंत्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:38 IST

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास आणि त्यांच्या हेकडपणामुळे झालेली आर्थिक कोंडी असह्य झाल्याने एका तरुण अभियंत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देबीएसएनएल अधिकाऱ्यांचा हेकडपणा : आर्थिक कोंडीमुळे नैराश्य : कारमध्येच घेतले विष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास आणि त्यांच्या हेकडपणामुळे झालेली आर्थिक कोंडी असह्य झाल्याने एका तरुण अभियंत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. आनंद दिनेश बाबरिया (वय ३०) असे मृताचे नाव आहे. तो गिट्टीखदानमधील हजारी पहाड भागात राहत होता.केमिकल इंजिनिअर असलेल्या आनंदच्या कुटुंबात आई आणि अमित नामक भाऊ आहे. आनंद आणि अमित हे दोघे बीएसएनएलसह अन्य शासकीय विभागाच्या कामाचे कंत्राट घेतात. त्यांनी येथील बीएसएनएलच्या केबल लाईनचे मोठे कंत्राट घेतले होते. काम सुरू असताना बीएसएनएलने हे कंत्राट रद्द केले. मात्र, झालेल्या कामाचे ९० लाख रुपये आनंद यांना घ्यायचे होते. त्यासाठी आनंदचा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत वाद सुरू होता. प्रकरण न्यायालयात गेले होते. तेथून ४२ लाख रुपये आनंद यांना देण्याचा आदेश बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते. मात्र, अधिकारी ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते.दोन महिन्यांपूर्वी आनंदचा भाऊ अमित पत्नी आणि आईसोबत दिल्लीत राहायला गेला होता. काही दिवसानंतर आनंदसुद्धा दिल्लीत गेला. मात्र, बीएसएनएलकडून रक्कम घ्यायची असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच तो नागपुरात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांच्या कक्षात तो चकरा मारत होता आणि अधिकाऱ्यांकडून त्याला टाळण्यासोबतच अपमानास्पद वागणूक मिळत होती. यामुळे आर्थिक कोंडी झाल्याने तो प्रचंड तणावात आला होता. याच अवस्थेतून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता तो आपल्या घरून कारने बाहेर पडला. त्याने शून्य माईलजवळ बीएसएनएलच्या कार्यालयालगत आपली कार उभी केली. येथे त्याने विष प्राशन केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, बरेच वेळेपासून कार उभी असल्याने एकाने कारमध्ये डोकावले असता कारमध्ये तरुण पडून दिसला अन् त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलिसांनी कारजवळ जाऊन आनंदला बाहेर काढले. त्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आनंदजवळ आणि कारमध्ये आढळलेल्या मोबाईल तसेच अन्य कागदपत्रावरून त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्र आणि नातेवाईकांना कळविले.मित्रांना जबर धक्कादरम्यान, आनदंच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्याचे स्थानिक नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येत सकाळपासूनच मेयो आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात गर्दी करून होते. दोन दिवसांपूर्वी एका समारंभात आनंदने त्याच्या मित्रमंडळीसोबत आनंदोत्सव साजरा केला होता. त्यावेळी त्याने बीएसएनएलच्या तीन अधिकाºयांकडून प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जात असल्याची माहिती मित्रांना दिली. आपली रक्कम अडकवून ठेवतानाच ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आर्थिक त्रास देत असल्याचेही सांगितले होते, असे समजते. तो व्यथित होता. मात्र, आनंद आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेल, अशी कुणी कल्पनाच केली नव्हती. त्याच्या आत्महत्येमुळे त्याच्या मित्रांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, रात्री आनंदचे दिल्लीतील नातेवाईकही नागपुरात पोहचल्याची माहिती आहे.सुसाईड नोटमध्ये अधिकाऱ्यांना दोषआनंदने त्याच्या एमएच ३१. ईए ३५२३ क्रमांकाच्या स्वीफ्ट कारमध्ये विष घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. त्याने आत्मघातासाठी भावाची माफी मागितली असून, आपल्या आत्महत्येला बीएसएनएलचे विभागीय अभियंता वासनिक, विभागीय अभियंता गाडे आणि जेटीओ अमितकुमार धोटे यांना जबाबदार धरले आहे. आनंदने या तिघांना त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे आपण आत्महत्या करणार, असा इशारादेखील दिला होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी प्राथमिक चौकशीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी या तिघांवर आनंदला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल होऊ शकतो, असे संकेत सीताबर्डी पोलिसांकडून मिळाले. आनंदने मृत्यूपूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचा व्हिडीओ बनविल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र आम्हाला तसा व्हिडीओ मिळाला नसल्याचे सांगितले.

 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याBSNLबीएसएनएल