शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अंबाझरीत दोघांना जबर मारहाण

By admin | Updated: February 22, 2017 02:39 IST

विरोधी गटातील कार्यकर्त्यांवर हल्ला चढवून दोघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी रामनगर परिसरात घडली.

फुके-चौधरींचे आरोप-प्रत्यारोप : जखमी अतिदक्षता कक्षात नागपूर : विरोधी गटातील कार्यकर्त्यांवर हल्ला चढवून दोघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी रामनगर परिसरात घडली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वेळीच पोलीस पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या घनश्याम चौधरी यांनी आमदार परिणय फुके, भाजपाचे प्रभाग १३ चे उमेदवार अमर बागडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप लावला. आमदार फुकेंनी मात्र हल्ल्याचा इन्कार केला आहे. मंगळवारी उपराजधानीत महापालिकेची निवडणूक पार पडली. जागोजागी गोंधळ, आपसातील वाद अन् बाचाबाचीच्याही घटना घडल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण निवळले. मतदानाची वेळ संपल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते-कार्यकर्ते आपापल्या कार्यालयात निघाले. रामनगर, हिलटॉप परिसरात भाजपाचे शहर उपाध्यक्ष घनश्याम चौधरी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाऊ वाघाडे वॅगनआर कारमधून रामनगरातील वर्मा लेआऊटमधून जात होते. वेगवेगळ्या वाहनांनी पाठलाग करीत आलेल्या आठ ते दहा जणांनी विघ्नहर्ता मंगल कार्यालयाजवळ त्यांना रोखले. कारमधून बाहेर खेचून चौधरी आणि वाघाडेंना हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. कारचीही तोडफोड केली. शिवीगाळ आरडाओरड आणि गोंधळामुळे या भागात मोठी गर्दी जमली. काही अंतरावरच बंदोबस्तावरील पोलीस ताफा होता. त्यांनी धाव घेऊन चौधरी आणि वाघाडे यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. हल्लेखोर ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. गंभीर अवस्थेतील चौधरी तसेच वाघाडेंना त्यांच्या सहकाऱ्यांनी रविनगर चौकातील दंदे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. चौधरींची प्रकृती लक्षात घेता त्यांना लगेच अतिदक्षता कक्षात नेण्यात आले. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेची माहिती कळताच भाजपा तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत दंदे हॉस्पिटलसमोर पोहोचले. तेथे मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस उपायुक्त राकेश कलासागर, अंबाझरीचे ठाणेदार अतुल सबनीस यांच्यासह मोठा पोलीस ताफा पोहोचला. त्यांनी जमावाला शांत केले. त्यानंतर डॉ. पिनाक दंदे यांच्याशी चर्चा करून जखमी चौधरी यांना घटनेबाबत माहिती विचारली. चौधरी यांनी आपल्याला आ. फुके, अमर बागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा तक्रारवजा आरोप पोलीस आयुक्त कलासागर यांच्याशी बोलताना लावला. दरम्यान, जखमींवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. पिनाक दंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली. आपला संबंध नाही : आ. फुके यासंबंधाने दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता आ. फुके यांनी हल्ल्याचा इन्कार केला. ते म्हणाले, भांडण सुरू असल्याचे आपल्याला कळले. त्यामुळे आपण तेथे गेलो. चौधरींना मारहाण होत असल्याचे पाहून आपण त्यांना वाचविण्यासाठी धावलो. त्यावेळी तेथे काहींनी दगडफेक केली. एक दगड आपल्याला लागल्याने आपण तेथून घरी आलो. नियंत्रण कक्षात १०० क्रमांकावर फोन करून त्याची माहिती दिली. दरम्यान, अमर बागडे आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना चौधरींनी जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे आपण बागडेंसोबत अंबाझरी ठाण्यात तक्रार द्यायला आलो आहे. चौधरींना ते कळले म्हणून त्यांनी आपले नाव या हल्ल्यात घेतले असावे, असेही आ. फुके म्हणाले. गंभीरपणे चौकशी : उपायुक्त कलासागर दरम्यान, पोलीस या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करीत आहे. वैद्यकीय अहवालाची गंभीरपणे चौकशी करीत असून, प्रत्यक्षदर्शींचे बयान तसेच वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त कलासागर यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना दिली.