शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवार, गावित, चव्हाण, खाडेंना धक्का; विखे पाटील, महाजन, पाटील, लोढा या ज्येष्ठांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:09 IST

शिंदे सरकारमधील पाच जणांना भाजपने पुन्हा दिली मंत्रिपदाची संधी; मंत्रिपदाबाबत भाजपचे धक्कातंत्र; नवीन चेहऱ्यांचा केला समावेश 

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या चार ज्येष्ठ नेत्यांना भाजपने पुन्हा मंत्रिपद नाकारले. त्यात सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांचा समावेश आहे. चौघेही विधानसभेवर पुन्हा निवडून आले असले तरी मंत्रिपदापासून वंचित राहिले. 

मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर पाच महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बल्लारपूर मतदारसंघात विजय मिळविला. यावेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते; पण राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली. 

मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा या ज्येष्ठांबाबत भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. त्यातील मुनगंटीवार यांना संधी नाकारण्यात आली; पण अन्य चौघांना मंत्रिपद मिळाले. 

पुन्हा मंत्री झाले, पण आता खाते कोणते?

प्रख्यात बिल्डर असलेले मंगलप्रभात लोढा हे सहाव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. २०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. पण शिंदे सरकारमध्ये त्यांना आधी महिला व बाल कल्याण, पर्यटन व काैशल्य विकास ही महत्त्वाची खाती मिळाली, मात्र नंतर अन्य दोन्ही खाती त्यांच्याकडून काढली गेली आणि त्यांच्याकडे फक्त कौशल्य विकास खाते होते. आता ते पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले आहेत. 

मंत्रिपद गेले; मुलगी आणि बंधूही पराभूत झाले

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये दीर्घकाळ मंत्रिपदी राहिलेले डॉ. विजयकुमार गावित यांना शिंदे सरकारमध्ये भाजपने आदिवासी विकास हे खाते दिले होते. यंदा ते नंदुरबारमध्ये जिंकले. त्यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांनी अक्कलकुवामध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली होती.  पाच महिन्यांपूर्वी नंदुरबार मतदारसंघात डॉ. हीना गावित भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढल्या; पण त्यांचा दारुण पराभव झाला होता. विजयकुमार गावित यांचे दोन बंधूही अन्य मतदारसंघांतून आणि अन्य पक्षांकडून लढले, मात्र पराभूत झाले. आता त्यांना पक्षाने मंत्रिपद नाकारले. 

हे नेते पुन्हा झाले मंत्री

शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारमधील राधाकृष्ण विखे पाटील,  गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा आणि अतुल सावे पुन्हा मंत्री झाले.

काहींची संधी हुकली, तर कुणाला मिळाली 

- सुरेश खाडे हे भाजपचे ज्येष्ठ आमदार. ते अनुसूचित जातीतून येतात. शिंदे सरकारमध्ये ते कामगार  मंत्री होते. यावेळी त्यांची संधी हुकली. 

- फडणवीस यांच्याशी असलेले घट्ट संबंध, संकटमोचक ही प्रतिमा गिरीश महाजन यांच्यासाठी धावून आली. 

- चंद्रकांत पाटील हे फडणवीस यांचा पाठिंबा आणि संघ परिवाराचे बळ यामुळे पुन्हा एकदा मंत्री झाले. 

- लोढा यांना मंत्रिपदाची कामगिरी, फडणवीस यांचा विश्वास आणि संघ परिवाराचा आशीर्वाद कामी आला, असे म्हटले जाते.  

 

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahayutiमहायुती