शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अचानक एस्केलेटर सुरू झाले अन् उमा भारती घाबरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 20:47 IST

बंद एस्केलेटरवरून चढून जात असताना अचानक ते सुरू झाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती घाबरल्या. त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडण्याची वेळ आली असती. त्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून लेखी तक्रार करीत यंत्रणेतील दोष दूर करण्याची तंबी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३२ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर घडली.

ठळक मुद्देरेल्वे अधिकाऱ्यांची कानउघाडणी : यंत्रणेत दुरुस्ती करण्याची तंबी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंद एस्केलेटरवरून चढून जात असताना अचानक ते सुरू झाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती घाबरल्या. त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडण्याची वेळ आली असती. त्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून लेखी तक्रार करीत यंत्रणेतील दोष दूर करण्याची तंबी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३२ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर घडली.भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांचे मंगळवारी दुपारी १२.२० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेसने आगमन झाले. प्लॅटफार्मवर उतरून त्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात होत्या. त्यांच्यासाठी रेल्वेस्थानकावरील बॅटरी कार तैनात करण्यात आली होती. परंतु त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी उमा भारती यांना बॅटरी कारमध्ये बसवायचे सोडून बॅटरी कारमध्ये सामान टाकले. यावेळी बाजूलाच बंद असलेल्या एस्केलेटरवरून उमा भारती वर चढत होत्या. काही पावले चालून झाल्यावर अचानक बंद असलेले एस्केलेटर सुरु झाले. अचानक सुरु झाल्यामुळे उमा भारती घाबरल्या. त्या सावध असल्यामुळे त्यांनी लगेच तोल सांभाळला. अन्यथा त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडल्या असत्या. त्यानंतर लगेच त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून घडलेल्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तक्रार पुस्तिका मागितली. त्यावर आपली तक्रार दाखल करून यंत्रणेतील दोष दूर करण्याची तंबी रेल्वे प्रशासनाला दिली. याबाबतीत रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती.बुक स्टॉलवाल्याने केले एस्केलेटर सुरूउमा भारती चढून जात असलेले एस्केलेटर त्या येण्यापूर्वी सुरू होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते बंद केले. एस्केलेटरवर त्या काही पावले चालून गेल्यानंतर बाजूला असलेल्या एका बुक स्टॉलवाल्याला उमा भारती जात असून एस्केलेटर बंद असल्याचे दिसले आणि त्याने बटन दाबून ते सुरु केले, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.स्पॉडिलायटीसचा त्रासामुळे लागला झटकाउमा भारती यांना स्पॉंडिलायटीसचा त्रास आहे. मंगळवारी दुपारी जीटी एक्स्प्रेसने आल्यानंतर त्या बंद एस्केलेटरवरून चढून वर जात होत्या. अचानक ते सुरु होऊन त्यांच्या पाठीला झटका लागला. यामुळे त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर