शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अचानक वाढली भाजीपाला व फळांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 10:29 IST

बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे एक व्यवसाय बंद पडला, दुसरा स्वीकारलाताळेबंदीत बदलला मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात केली आहे.कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात १९ पासून आणि देशात २४ मार्चपासून टाळेबंद लागली असून, महिनाभरापासून अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. लहान-मोठे व्यवसाय करून प्रपंच चालविणाऱ्यांची कामेही बंद झाली आहेत. कर्ज काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते भरण्यापासून ते कुटुंब चालविण्याच्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी दुसरा मार्ग स्वीकारला आहे. एक व्यवसाय बंद होताच दुसरा सुरू केला आहे. सरकारने या टाळेबंदीतून औषधालय, किराणा आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक गोष्टी वगळल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी भाजीपाला आणि फळे विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे शहरात अचानक भाजीपाल्याची आणि फळांची दुकाने वाढली आहेत.मंगेश, उमेश व विनोद यांचाही ट्रॅव्हल्सचा व्यवसाय या टाळेबंदीत बंद पडला आहे. त्यांनी कर्ज काढून वाहने खरेदी केली होती. त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडण्याची अडचण त्यांना येणार आहे. त्यांच्या घरातील ते एकटेच कमावणारे असल्याने कुटुंबाची चिंता लागून आहे. त्यामुळे मित्रांनी मिळून टरबूज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जवळची गुंतवणूक केल्याने रिस्क असून व्यवसाय बुडाला तर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्वांनी रिस्क घेऊन हा व्यापार सुरू केला. आर्थिक प्रश्न मिटला नसला तरी बऱ्याच अंशी कमी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या मित्रांप्रमाणे अनेकांनी दुसऱ्या व्यवसाय सुरू केला आहे. यातही सोपा मार्ग म्हणून फळे आणि भाजीपाला विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच की काय शहरात भाजी विक्री आणि फळे विक्रीची दुकाने वाढल्याचे दिसून येत आहे.हा प्रकार गंभीर पण...लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला गेला असताना अशाप्रकारे व्यवसाय सुरू करणे चिंतेचे कारण आहे. लोकांचा रोजगार गेल्याने पर्याय नसल्याने वेगळे मार्ग निवडले आहेत. मात्र अचानक भाजीची दुकाने वाढणे हा सुद्धा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस