शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

निवृत्तीपेक्षा उत्तराधिकाऱ्याचे नियोजन जास्त महत्त्वाचे : राहुल बजाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 21:58 IST

मी ‘बजाज ऑटो’ व ‘बजाज फायनान्स’मधून २००५ सालीच निवृत्त झालो आहे आणि आता दोन्ही कंपन्यांचा मी गैरकार्यकारी चेअरमन आहे. मात्र मी अद्यापही काम करणे थांबविलेले नाही. कारण उत्तराधिकाऱ्याचे नियोजन हे निवृत्तीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ‘बजाज ऑटो’ समूहाचे चेअरमन राहुल बजाज यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी बजाज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देनिवृत्तीची नेमकी वेळ ठरविलेली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मी ‘बजाज ऑटो’ व ‘बजाज फायनान्स’मधून २००५ सालीच निवृत्त झालो आहे आणि आता दोन्ही कंपन्यांचा मी गैरकार्यकारी चेअरमन आहे. मात्र मी अद्यापही काम करणे थांबविलेले नाही. कारण उत्तराधिकाऱ्याचे नियोजन हे निवृत्तीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे, असे मत ‘बजाज ऑटो’ समूहाचे चेअरमन राहुल बजाज यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अंत्यसंस्कारासाठी बजाज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.तुम्ही अद्याप निवृत्त का झाला नाही, असे कुणी विचारायची प्रतीक्षा करणे योग्य नाही. उलट काम करणे थांबविल्यावर तुम्ही इतक्या लवकर का निवृत्त झाले, असा लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे. त्यामुळेच मी २००५ साली व्यवस्थापनाचे नियंत्रण माझ्या मुलांकडे सोपविले, मात्र अद्यापही त्यांच्यासोबत काम करतो आहे. काम करणे थांबविण्याचा मी विचार करतो आहे, मात्र त्यासाठी मी निश्चित वेळ ठरविलेली नाही, असे बजाज यांनी सांगितले.‘स्कूटर’ क्षेत्रातून बाहेर पडणे चुकीचा निर्णय२००९ साली ‘स्कूटर’ उत्पादनातून बाहेर पडण्याच्या व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या निर्णयाबाबत यावेळी राहुल बजाज यांनी भाष्य केले. कंपनीचा चेअरमन या नात्याने मला हा निर्णय पटला नव्हता आणि मी त्याचे समर्थनदेखील केले नाही. मी सार्वजनिकपणे माझी भूमिका मांडली होती. व्यवस्थापकीय संचालकांनी निर्णय घेतला होता व तेच त्याचा उत्तरदायी ठरतील, असे बजाज यांनी स्पष्ट केले. ‘गेअरलेस’ दुचाकींची मागणी वाढत असताना बजाज समूह परत ‘स्कूटर’चे उत्पादन सुरू करणार का अशी विचारणा केली असता तुम्ही एक योग्य प्रश्न चुकीच्या व्यक्तीला विचारत आहात, असे उत्तर त्यांनी दिले.बजाजची चारचाकी लवकरच बाजारात‘बजाज ऑटो’कडून लवकरच ‘क्युट’ या नावाची चारचाकी बाजारात उतरवली जाणार आहे. या चारचाकीमध्ये ‘टू स्ट्रोक’चे ‘इंजिन’ असून याची किंमत जवळपास सव्वा लाख इतकी असेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात लहान कारहूनदेखील ही चारचाकी लहान असेल. शहरांमधील दळवळणाची आवश्यकता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे बजाज यांनी सांगितले.संघ मुख्यालयाची भेट रद्दराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राहुल बजाज यांना संघ मुख्यालयात येण्याचे निमंत्रण दिले होते. विमानतळावर महानगर संघचालक राजेश लोया यांनी बजाज यांना निमंत्रण दिले. बजाज यांनी वेळ असल्यास नक्कीच येऊ, असे कळविले. मात्र काही अडचणीमुळे बजाज भेटायला जाऊ शकले नाहीत. भेट रद्द करत असल्याबाबत त्यांनी लोया यांना कळविले आणि पुढील दौऱ्यात नक्कीच संघ मुख्यालयात येऊ, असे आश्वासन दिले.

 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलinterviewमुलाखत