शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत मायट्रल व्हॉल्व्हचे यशस्वी रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 11:28 IST

छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरेमार्गे हृदयावर कृत्रिम ‘मायट्रल’ झडप (व्हॉल्व्ह) रोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पार पडली.

ठळक मुद्देमध्य भारतातील पहिली शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छातीला चिरफाड न करता जांघेच्या शिरेमार्गे हृदयावर कृत्रिम ‘मायट्रल’ झडप (व्हॉल्व्ह) रोपण करण्याची यशस्वी शस्त्रक्रिया न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पार पडली. महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत पाश्चात्य देशातून ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ मागावे लागायचे. परंतु पहिल्यांदाच भारतात तयार झालेल्या या व्हॉल्व्हचे रोपण नागपुरात झाले. मध्यभारतातील हे पहिले प्रकरण आहे, अशी माहिती प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. निधीश मिश्रा यांनी दिली.मोरेश्वर भावे या ७० वर्षीय रुग्णावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ करून ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ बदलविण्यात आले होते. आठ वर्षानंतर त्यांना पुन्हा धाप लागणे, हृदयात धडधड होणे आणि दुखणे वाढले होते. भावे यांनी ‘न्यू इरा हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’ गाठले. डॉ. मिश्रा यांनी त्यांची तपासणी केली. इकोकार्डिओग्राफीमध्ये हृदयात बसविण्यात आलेले ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ खराब झाल्याचे निदान झाले. परंतु या पूर्वी झालेली शस्त्रक्रिया व वय पाहता पुन्हा ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. यावर दुसरा उपाय म्हणून खराब झालेल्या झडपेवर दुसरी झडप लावण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. मिश्रा म्हणाले, याला वैद्यकीय भाषेत ‘ट्रान्स कॅथेटर मायट्रल व्हॉल्व्ह रिप्लसेमेन्ट’ म्हणतात. ज्या पद्धतीने अ‍ॅन्जिओग्राफी केली जाते त्याच पद्धतीने जांघेच्या शिरातून कॅथेटर टाकण्यात आले. दोन हृदयकप्प्यातील पडद्यास छिद्र पाडून जुन्या ‘मायट्रल व्हॉल्व्ह’वर नवी झडप लावण्यात आली. टेबलावरच इकोद्वारे चाचणी करून ‘व्हॉल्व्ह’ योग्य जागी व पक्के बसल्याची खात्री करण्यात आली. विशेष म्हणजे, व्हॉल्व्ह लावताच हृदयाची क्रिया व गती सुरळीत झाल्याने रक्तदाबही सामान्य झाला. या शस्त्रक्रियेमुळे भावे यांना पुन्हा नवेजीवन मिळाले, असेही त्यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. मिश्रा, यांच्यासह हृदयारोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती, न्युरोलॉजिकल व स्पाईन सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र मस्के, डॉ. सुबुंल सिद्दिकी व डॉ. साहिल बन्सल यांनी यशस्वी केली.मेक इन इंडियाची मदतडॉ. मिश्रा म्हणाले, कालपर्यंत ‘मायट्रल व्हॉल्व्ह’ भारतात तयार होत नव्हते. ते पाश्चात्य देशातून मागवावे लागायचे. यात वेळ व पैसाही मोठा खर्च व्हायचा. आता मेक इन इंडिया अभियनांतर्गत भारतातच मेरील कंपनीने मायट्रल व्हॉल्व्ह तयार करणे सुरू केले. भारतात तयार झालेला हा व्हॉल्व्ह मध्यभारतात नागपुरात पहिल्यांदाच रोपण करण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्य