शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 05:15 IST

दिलीप वेंगसरकर : फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता

ठळक मुद्देलोकमतसोबत विशेष बातचीत करताना वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या भविष्याबाबत चर्चा केली

नीलेश देशपांडेनागपूर : चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहील, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ‘कर्नल’ नावाने ओळखल्या जाणारे वेंगसरकर लॉर्ड्सवर १९८६ मध्ये शतकांच्या हॅटट्रिकसह विजयाचे शिल्पकार ठरले होते.

लोकमतसोबत विशेष बातचीत करताना वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या भविष्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये यशाचे रहस्य फलंदाजी ठरेल. जर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली तर त्यांना त्यांच्याच देशात आव्हान देता येईल.’ विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ पुनरागमन करू शकतो का, याबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘का नाही? कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या शानदार कामगिरीची पूर्ण आशा आहे. संघ समतोल असून मालिकेच्या वाटचालीसह कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकते.’

संघाच्या संयोजनाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘खेळपट्टीचे स्वरूप बघून किती फिरकीपटूंना संधी द्यायची, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. पण, माझ्या अनुभवावरून असे वाटते की, इंग्लंडमध्ये या वातावरणात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.’

n पुजाराच्या निराशाजनक कामगिरीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडूची आपली एक शैली असते. त्याचसोबत प्रत्येक खेळाडूला न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेगवेगळा अवधी लागतो. अनेकदा कुणी यशस्वी ठरतो. त्यामुळे केवळ पुजाराच नव्हे तर अन्य फलंदाजही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरू शकतात.‘

...त्यामुळे डब्ल्य   यूटीसी फायनलमध्ये पराभवn डब्ल्य  यूटीसी फायनलमधील पराभवासाठी वेंगसरकर यांनी सराव सामना न खेळायला मिळणे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. n ते म्हणाले, ‘इंग्लंडमधील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी सराव सामने खेळणे आवश्यक आहे. इंट्रा स्क्वाॅड लढतींना काही अर्थ नसतो.‘ 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघ