शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

यशोगाथा! उच्च शिक्षणाचा लाभ कुणाच्या ताबेदारीसाठी नव्हे, तर स्वतःच्या शेतीसाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 08:00 IST

Nagpur News काही उच्च शिक्षित तरुणांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. कळमेश्वर तालुक्यातील पिपळा (किनखेडे) येथील अमोल भैयाजी फुलारे आणि कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर यांची यशोगाथा अशीच आहे.

जितेंद्र ढवळे

नागपूर : ग्रामीण भागात बेरोजगारीचा ग्राफ वाढतो आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. यामुळे तरुणांमध्ये नैराश्य येते. चार वर्षांपासून शासकीय पदभरती नाही. पदभरती झाली तर नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. यावर मात करीत काही उच्च शिक्षित तरुणांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आहे. कळमेश्वर तालुक्यातील पिपळा (किनखेडे) येथील अमोल भैयाजी फुलारे आणि कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर यांची यशोगाथा अशीच आहे. या दोन तरुणांनी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेत कर्तृत्व सिद्ध केले आहे.

- उच्च शिक्षणाचा लाभ शेतीसाठी, धंद्यासाठी

उच्च शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न पडता अमोल आणि सचिन यांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला. आपण जे शिकलो ते कृतीत कसे साकारता येईल. यातून इतरांना कसा रोजगार मिळवून देता येईल, या उद्देशाने हे तरुण सध्या काम करीत आहेत.

-अमोल फुलारे, ता. कळमेश्वर (७ एकर शेती, रोपवाटिका)

पिपळा (किनखेडे) येथील अमोल फुलारे यांच्याकडे ७ एकर शेती आहे. पारंपरिक शेतीसोबत त्यांनी संत्रा रोपवाटिका तयार केली आहे. शेतकऱ्यांना ते उत्कृष्ट दर्जाची संत्र्याची रोपे तयार करून देतात. याशिवाय ४ एकरांत त्यांचा संत्र्याचा बगिचा आहे. संत्रा विक्रीतून ते वर्षाला ६ ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न घेतात. याशिवाय ३० आर क्षेत्रात त्यांनी संत्रा रोप (पणेरी) सुरू केली आहे. वर्षभरात ते संत्र्याची ४० हजार रोपे तयार करतात. ४० रुपयांप्रमाणे या रोपाची ते विक्री करतात.

सचिन चिकनकर, ता. कामठी (४ एकर शेती, डेअरी फार्म)

 

कामठी तालुक्यातील बिना येथील सचिन चिकनकर यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांच्याकडे सीताफळाची बाग आहे. त्यांनी शेतात आदर्श डेअरी फार्म उभे केला आहे. सध्या त्यांच्याकडे २१ गायी असून, रोजचे दुधाचे उत्पादन २१० लिटर इतके आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरीच्या माध्यमातून बिना येथील फार्मवर इतर शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनाचे प्रशिक्षण देता यावे यासाठी मायक्रो ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातूनही सचिन यांना नवा रोजगार मिळाला आहे.

एकाचे शिक्षण एम.ए., बी.एड., तर दुसऱ्याचे अभियांत्रिकी

पिपळा (किनखेडे) येथील अमोल फुलारे एम.ए., बी.एड. आहेत. ग्रामविकासाचा संकल्प करीत ते स्वयंरोजगाराकडे वळले. बिना येथील सचिन चिकनकर यांनी बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) केले आहे.

 

३) वर्षाला उत्पन्न किती?

संत्रा रोपवाटिका आणि शेतीतून अमोल फुलारी यांना वर्षाला ८ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न होते, तर दुग्ध व्यवसायातून सचिन चिकनकर यांची वार्षिक कमाई १० लाख रुपये इतकी आहे.

 

कष्टाशिवाय फळ नाही

नोकरी लागली नाही म्हणून काहीच करायचे नाही, असे कुणी सांगितले आहे. शिक्षण हे यशाचा मार्ग मिळविण्याचे माध्यम आहे. पुढे जायचे आहे, तर कष्ट करावेच लागतील.

-अमोल फुलारी, पिपळा (किनखेडे), ता. कळमेश्वर

उच्च शिक्षण घेतले म्हणजे नोकरी मिळेलच असे नाही. चांगल्या नोकरीची अपेक्षा करणे चुकीचेही नाही. मात्र, शिक्षणाचा फायदा रोजगार निर्मितीसाठी झाला, तर अधिक चांगले.

-सचिन चिकनकर, बिना, ता. कामठी

टॅग्स :agricultureशेती