शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

यशोगाथा; जे मनात आहे, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:57 AM

एक-दोन नव्हे तर देशभरातील ५० शाळा, आश्रमशाळा व बालगृहांचा कायापालट मैत्रेयी जिचकार या तरुणीच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘झीरो ग्रॅव्हीटी’च्या माध्यमातून करण्यात आला.

ठळक मुद्देवेगळ्या वाटेवर प्रवास करणाऱ्या वल्ली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी शाळांची वाईट परिस्थिती पाहून इतरांप्रमाणे तिचेही मन अस्वस्थ होत होते. पण नुसती खंत व्यक्त करून ती गप्प बसली नाही, तर या शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्धार तिने केला. युनिसेफच्या ‘बिल्डिंग अ‍ॅज लर्निंग एड’ (बाला) या योजनेची मदत घेत अशा उजाड झालेल्या शाळांच्या भिंतींची रंगरंगोटी, वर्गखोल्यांना अभ्यासक्रमातील विषयानुरूप कलात्मक रूप दिले व विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी लागेल, अशी आकर्षकता निर्माण केली. अशा एक-दोन नव्हे तर देशभरातील ५० शाळा, आश्रमशाळा व बालगृहांचा कायापालट मैत्रेयी जिचकार या तरुणीच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘झीरो ग्रॅव्हीटी’च्या माध्यमातून करण्यात आला.आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात चालत असलेल्या वाटेपेक्षा काही तरी नवीन करण्याची, मिळविण्याची इच्छा असते. पण कधी परिस्थितीच्या नावाने किंवा या नव्या वाटेने चालताना यश मिळेल की नाही, या भीतीपोटी आपल्या इच्छा मनातच दाबत असतो. पण भीती मनात बाळगून चांगले काही गमावण्यापेक्षा जे मनात आहे ते प्रामाणिकपणे करा, यश नक्की मिळेल. अशा वेगळ्या वाटेवर चालणाºया वेगळ्या वल्लींचा प्रेरणादायी प्रवास ‘टेड-एक्स’तर्फे आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला. मैत्रेयीसह मेकर्स अड्डाचे ललित विकमशी, संगीतवाद्य निर्माते परविंदर सिंह, ‘समलैंगिक’साठी काम करणाऱ्या सारथी ट्रस्टचे निकुंज जोशी, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य शिकविणारे सुमंत टेकाडे व गिटारिस्ट रोनॉल्ड जॉन यांनी त्यांचा प्रवास तरुणांसमोर मांडला.मैत्रेयीच्या संस्थेत ८०० ते ९०० स्वयंसेवक सेवा देतात. त्यातील सक्रिय सदस्य सातत्याने या उपक्रमाशी जुळले आहेत. मैत्रेयीने सुरुवातीला नागपुरातील मनपाच्या शाळांसाठी ही संकल्पना मांडली होती, मात्र महापालिकेले त्यास नकार दिला. मात्र आज तिचे यश पाहून उच्च न्यायालयानेच शहरातील पाच शाळांना बदलविण्याचे कंत्राट संस्थेला दिले आहे.मनात असेल ते शिकविणारी शाळा : विकमशीआपली शिक्षण व्यवस्था एका साच्यात बांधली आहे. अभ्यासक्रमातील गोष्टींची घोकंपट्टी करा आणि परीक्षेत गुण मिळवा, हीच काय ती साचेबद्धता. त्यात विद्यार्थ्यांच्या मनात कल्पना सुचायला वाव नाही. ललित विकमशी यांना ते नको होते. कुणाला कलेची आवड आहे तर कुणाजवळ नवीन काहीतरी निर्माण करण्याची कल्पना आहे. अशा कलात्मक व कल्पकांसाठी त्यांनी १५ वर्षांपूर्वी ‘अलग अँगल’ व ‘मेकर्स अड्डा’ ही वेगळ्याच प्रकारची शाळा काढली. या अनोख्या शाळेतूनच परविंदरसारख्या तरुणाला नवीन संगीतवाद्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. हा अनोख्या शाळेचा प्रवास विकमशी यांनी मांडला. यावेळी सुमंत टेकाडे, रोनॉल्ड जॉन व निकुंज जोशी यांनीही आपल्या वेगळ्या वाटेवरचा प्रवास उलगडला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक