शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निधीतून होणाऱ्या कामांचे व्हिडिओ सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:29 IST

अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश : मौदा-कामठीत ११ हजारावर शेतकऱ्यांना ६७.७५ कोटीचे कर्जमाफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय निधी ज्या शासकीय संस्थांना वितरित केला जातो, त्या निधीतून होणाऱ्या सर्व कामाचे व्हिडिओ सादर करा तसेच नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करा. तूर्तास अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिले. मौदा व कामठी उपविभागात ११ हजारावर शेतकऱ्यांना आतापर्यंत ६७.७५ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ झाल्याचे पत्र पाठविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.मौदा-कामठी उपविभागाची बैठक मौदा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आज झाली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, मौदा न.प.च्या अध्यक्ष भारती सोमनाथे, टेकचंद सावरकर, अनिल निधान, रमेश चिकटे, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, सदानंद निमकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे यांनी एकेका विभागाचा आढावा घेऊन आतापर्यंत शासकीय योजनेच्या झालेल्या कामाची माहिती करून घेतली. यात नाला खोलीकरण, पालकमंत्री पांदण रस्ते, कृषी विभाग, कर्जमाफी योजना, पीक विमा, भूमिअभिलेख, पंतप्रधान आवास योजना, समाजकल्याण विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जि.प. बांधकाम, राज्य रस्ते, केंद्रीय मार्ग निधीतील रस्ते, आयुष्यमान योजना, उज्ज्वला गॅस योजना, अंत्योदय, अन्न योजना, महावितरणने केलेली कामे, सिंचन योजना, धडक सिंचन विहिरी अशा सर्व कामांची माहिती घेत आढावा घेण्यात आला. दलित वस्त्यांमधील कामांमध्ये कामाच्या दर्जाबाबत समझोता केला जाणार नाही. सर्व कामे ही ठरवून दिलेल्या निकषानुसारच असली पाहिजे, याकडेही पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.आतापर्यंत शासनाने दिलेल्या निधीतील ८० टक्के काम पूर्ण झाली असून उर्वरित २० टक्के कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या उपविभागात आतापर्यंत ६८ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. सन २०१९-२० मध्ये पेंच लाभ क्षेत्राशिवाय मौदा तालुक्यात ४० व कामठी तालुक्यात ४० धडक सिंचन विहिरींचे काम आहे. राष्ट्रीय पेयजल योजना व अन्य पाणीपुरवठा योजनाअंतर्गत रनाळा येरखेडा आणि बिडगाव तरोडी या दोन योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. विविध योजनांद्वारे सिंचनाची कामे, जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण, बंधारे, पाणीपुरवठा योजना यासाठी मोठ्या प्रमाणात निधी शासनाने या उपविभागाला उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेGovernmentसरकारfundsनिधी