शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

उपराजधानीतील ९५ मुतारी दुर्गंधीमुक्त : अभिनव अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 10:42 PM

शहरातील सार्वजनिक मुतारी नियमित स्वच्छ राहात नाही. दुर्गंधीमुळे नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला लघुशंका करतात. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. मात्र स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात देशात सर्वप्रथमच सेंद्रीय पावडरचा वापर करून सार्वजनिक ९५ मुतारी दुर्गंधीमुक्त झालेल्या आहेत.

ठळक मुद्देदेशात प्रथमच मुतारी स्वच्छतेसाठी सेंद्रीय पावडरचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सार्वजनिक मुतारी नियमित स्वच्छ राहात नाही. दुर्गंधीमुळे नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला लघुशंका करतात. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. परंतु अंमलबजावणी होत नसल्याने नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. मात्र स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात देशात सर्वप्रथमच सेंद्रीय पावडरचा वापर करून सार्वजनिक ९५ मुतारी दुर्गंधीमुक्त झालेल्या आहेत.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा लाभ सर्व स्तरातील नागरिकांना व्हावा, यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. ‘स्वच्छालय अपनाओ, स्वच्छ भारत बनाओ’ अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. ती प्रत्यक्षात अंमलात आणली आहे. शहरातील सर्व मुतारी दुर्गंधीमुक्त करण्यासाठी देशात प्रथमच ऑर्गेनिक (सेंद्रीय) पावडरचा वापर करण्यात आला. नोव्हेंबर २०१८ मध्ये नागपुरात या अभिनव अभियानाची सुरुवात केली होती. आज शहरातील ९५ मुतारी स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. हा उपक्रम देशभरात राबविण्याचा त्यांचा मानस आहे.नागपूर शहराच्या विविध भागात महापालिकेच्या सार्वजनिक ९५ मुतारी आहेत. परंतु दुर्गंधीमुळे अनेक मुतारींचा वापर होत नाही. वर्दळीच्या ठिकाणी वा बाजारात येणाऱ्या महिलांची कुचंबणा होते. परिणामी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. नागरिक मुतारीच्या आजूबाजूला लघुशंका करतात. यामुळे परिसरात घाण पसरते. लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. यातून नागरिकांची सुटका झाली आहे.मुतारींचा नागरिकांनी वापर करावा, यासाठी नितीन गडकरी यांनी शहरातील सर्व मुतारी दत्तक घेतल्या. त्यांनी मुतारीमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी सेंद्रीय पावडरचा वापर करण्याच्या सूचना दिल्यात. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या अभियानावर मोठा खर्च न करता नागरिकांना सुविधा झाली आहे. सोबतच नागपूर शहर स्वच्छ राहण्याला मदत होत आहे.सर्वप्रथम नागपुरात सुरुवातस्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावायला लागली आहे. . स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सांडपाण्याचा पुनर्रवापर केला जात आहे. सिमेंट काँक्रीट रोड, कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभे राहात आहे. स्मार्ट शहरातील शौचालये व मूत्रीघर स्मार्ट असावे, ते दुर्गंधुमुक्त असावे. यासाठी सेंद्रीय पावडराचा वापर करण्याचा अभिनव उपक्रमाला नागपूर शहरात सर्वपप्रथम सुरूवात करण्यात आली आहे.नैसर्गिक पद्धतीने पावडर निर्मितीमूत्रीघर वा शौचालयातील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी सेंद्रीय पावडर शेवाळापासून बनविण्यात आली आहे. १ किलो पावडरमध्ये ४० ते ५० मूत्रीघर वा शौचालय दुर्गंधीमुक्त करणे शक्य आहे. प्रतिकिलो ९०० रुपये दराची ही पावडर देशात सर्वत्र उपलब्ध आहे. नैसर्गिक पद्धतीने ही पावडर निर्माण केली असल्याने आरोग्यासाठी कुठलाही अपाय होत नाही. रासायनिक पदार्थांचा समावेश नसल्याने पर्यावरण संवर्धनालाही मदत होत आहे.राज्य व देशपातळीवर ‘मिशन’ राबविणारसामान्य माणूस सार्वजनिक मुताऱ्यात जात नाही. याचे कारण तेथील दुर्गंधी असते. नागपूर शहरातील सर्व ठिकाणी आणि मुताऱ्या दुर्गंधी मुक्त असाव्यात. नागरिकांची सुविधा व्हावी.यासाठी मुतारी स्वच्छता ‘मिशन’राबविण्यात आले. यात यश आले. हे ‘मिशन’ हळुहळू राज्य व देशपातळीवर नेण्याचा संकल्प नितीन गडकरी यांनी केला आहे.जलप्रदूषणाला आळा बसणारशौचालय व मूत्रीघर स्वच्छ करण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. परिणामी अशा प्रदूषित सांडपाण्यातून नदी वा नाल्यातील पाणी दूषित होते. पुढे हेच पाणी धरणात जाते. तसेच भूगर्भातील जलसाठा प्रदूषित होतो. याचा लोकांच्या व जलचर प्राण्यांच्या आरोग्यावर परिणात होतो. शौचालय वा मूत्रीघर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी सेंद्रीय पावडरचा वापर केला जाणार असल्याने मोठ्याप्रमाणात जलप्रदूषणाला आळा बसणार आहे.शहरातील ९५ मुतारी स्वच्छ करण्यासाठी सेंद्रीय पावडरचा वापर केला जातो. यात सोनेगाव तलावाजवळ, नरेंद्रनगर, धंतोली झोन कार्यालयाच्या बाजूला, लक्ष्मीनगर झोन, बजाजनगर ते सुंदरलाल चौक, आरबीआय क्वार्टर चौक, बजाजनगर ते अभ्यंकरनगर रोड, जतंरमंतर अपार्टमेंट, महाराजबाग रोड, एनआयटी कार्यालयासमोर, रेशीमबाग मैदान, उदयनगर एनआयटी बगिचा, मानेवाडा दहन घाट रोड, तुकडोजी पुतळा रोड, गीता मंदिरसमोर,डालडा कंपनी घाट रोड, गुजरवाडी, मेडिकल चौक, नरेंदनगर रिंगरोड, नरेंद्रनगर वाहतूक कार्यालय, रमणा मारोती मंदिरजवळ, सक्करदरा उड्डाणपुलाखाली, दिघोरी दहन घाट, संघ बिल्डिंग महाल, सोख्ता भवन, पंचवटी चौक, लष्करीबाग, कडबी चौक, मस्कासाथ रेल्वे पुलाजवळ, रामपेठ गोल चौक, प्रेमनगर गजानन चौक, शांतीनगर बगिचा, देवातारे चौक, जोशीपुरा, मच्छीसाथ, बंसोड पुरा, पितळ ओळ, शास्त्री बगिचा, हनुमान मंदिर बांग्लादेश, बुधवारी, सराफा मार्केट, गांधीबाग बगिचाजवळ, मॉडेल मिल चौक, गणेश चौक, कल्याणेश्वर मंदिरजवळ, लाकडी पूल, गरुड खांब, नाल साहेब चौक, चिमाबाई पेठ, क ब्रस्थान, अयोध्यानगर, फुटाणा मार्केट इतवारी, सतरंजीपुरा कार्यालयाच्या बाजूला, अनाज बाजार,पारडी पोलीस चौकी, मिनीमातानगर, पारडी नवीन मटण मार्केट नागनदी पुलाजवळ, इंदोरा, पाटणकर चौक, भोसलेवाडी, आवळे बाबू चौक, आशीनगर झोन, आर्य समाज मंदिरजवळ, जरीपटका हॉकर्स झोनजवळ, दर्ग्याच्या बाजूला नवीन वस्ती, जनता कुल्फी जरीपटका रोड, रैन बसेरा इत्यादी.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर