शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी : परिणय फुके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:06 IST

आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.

ठळक मुद्दे पारडी व हिवरीनगर येथील वसतिगृहांची केली पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आदिवासी वसतिगृहात खानावळीतून मिळणाऱ्या खाद्यान्नांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी आदिवासी मुलामुलींनी स्वत: वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्त्वावर खानावळ चालवावी, असे आवाहन आदिवासी विकास,वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.आदिवासी मुलांचे पारडी येथील शासकीय वसतिगृह तसेच हिवरीनगर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले. आदिवासी मुलांचे तसेच मुलींच्या शासकीय वसतिगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा हा सुमार असल्याबाबतच्या तक्रारी आदिवासी विभागाकडे येत होत्या. यासंदर्भात शासनाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) योजनेव्दारे खानावळीसाठी दर महिन्याला ३ हजार ५०० रुपये जमा होतात. या रकमेतून विद्यार्थी हव्या असलेल्या खानावळीतून डबा मागवतात. परंतू ज्यादा शुल्क अदा करुन देखील खाद्यपदार्थांची गुणवत्ता निकृष्ट राहते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन प्रायोगिक तत्त्वावर केवळ एक महिन्यासाठी सहकारी खानावळ चालवावी. यामध्ये गृहप्रमुख, गृहपाल यांच्या देखरेखीखाली आदिवासी वसतिगृहामध्ये खानावळ चालविण्यासाठी इच्छूक उमेदवारांसाठी जाहिरात काढण्यात यावी. या अंतर्गत खानावळीत स्वच्छता आणि दर्जा कायम राखून विद्यार्थ्यांना योग्य आहार पुरविणाऱ्या खानावळी चालकाची नेमणूक करावी. अन्न पदार्थ गृहप्रमुख, गृहपाल तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीमध्ये वसतिगृहाच्या स्वयंपाक घरामध्ये बनविण्यात येतील. या योगे विद्यार्थ्यांना ताजे आणि उत्तम खाद्यपदार्थ वेळेवर उपलब्ध होतील, असेही फुके यांनी सांगितले.इंटरनेट सुविधा मिळणार विद्यार्थिर्नींनी ग्रंथालयामध्ये असणाºया संगणकांसाठी इंटरनेटच्या सुविधेची मागणी केली. विद्यार्थिनींची ही मागणी पूर्ण करण्यासंदर्भात डॉ. फुके यांनी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल शीतल मानकर यांना सूचना दिल्यात.प्रवेश प्रक्रीया सुरु आदिवासी मुलांच्या वसतीगृहामध्ये एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता असून सध्यस्थितीला नवीन ८१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी वसतीगृहात राहत आहेत. आदिवासी मुलींच्या वसतीगृहामध्ये १०० विद्यार्थिनींची क्षमता असून सध्यस्थितीला ३६ विद्यार्थिनी वसतीगृहात राहत असून नवीन विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु आहे.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेStudentविद्यार्थी