शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्याचे रँगिंग : आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:37 IST

अजनी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात आयुर्वेदिक शाखेच्या विद्यार्थ्याची रँगिंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या अंगावर लघवी करणे आणि विष पाजण्यात आल्याचा आरोप आहे. अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पीडित विद्यार्थ्याचे बयान घेतल्यानंतर आठ विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे अजनी पोलिसात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमारहाण करून अंगावर लघवी केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात आयुर्वेदिक शाखेच्या विद्यार्थ्याची रँगिंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या अंगावर लघवी करणे आणि विष पाजण्यात आल्याचा आरोप आहे. अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पीडित विद्यार्थ्याचे बयान घेतल्यानंतर आठ विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे अजनी पोलिसात खळबळ उडाली आहे.चंद्रमणीनगर येथे शासकीय आदिवासी वसतिगृह आहे. येथे आदिवासी समाजातील मेडिकल व इंजिनियरिंगचे विद्यार्थी राहतात. परभणी येथील विष्णू पवार असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. रँगिंगची घटना ही २१ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. विष्णूनुसार आरोपी विद्यार्थी त्याला अनेक दिवसांपासून त्रास देत होते. मारहाणही करीत होते. २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्याच्या शरीरावर लघवी करून फिनाईलमध्ये विष टाकून त्याला बळजबरीने पाजले. प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले.आरोपी विद्यार्थी मात्र रँगिग केल्याचे नाकारत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, विष्णू चार-पाच महिन्यांपूर्वीच हॉस्टेलमध्ये आला. बहुतांश विद्यार्थी रात्री ९ वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये येऊन जातात. मेडिकलचे विद्यार्थी मात्र इंटर्नशिप किंवा आपात्कालीन सेवेमुळे रात्री उशिरा येतात. विष्णूही अनेकदा उशिरा येत होता. २२ तारखेला रात्री १२.१५ वाजता विष्णू बाल्कनीमध्ये कोल्ड ड्रिंकच्या बॉटलमध्ये पांढऱ्या  रंगाचे रसायन टाकून पित होता. प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणीवसतिगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. यामुळे नेमके काय घडले, याची माहिती मिळू शकते. चंद्रमणीनगरातील वसतिगृह अनेक दिवसांपासून आहे. येथील अनेक विद्यार्थी मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून शिकण्यासाठी येतात. येथून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी शासकीय विभागात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. घटनेची माहिती होताच तेही घटनास्थळी धावून आले होते.आॅडियो क्लिपींगही केली तयारविष्णूने आॅडियो क्लिपींग तयार करून त्याला चार-पाच विद्यार्थ्यांनी मारहाण केल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आहे. ही क्लिपींग त्याने वसतिगृहातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही पाठवली आहे. पोलीस या क्लिपींगचीही तपासणी करीत आहे.पोलिसांचा दबाव, पवार कुटुंब दहशतीतमिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहात रॅगिंग घेणाऱ्या आरोपीची एक नातेवाईक पोलीस विभागात कार्यरत आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी ती महिला धडपड करीत होती. विष्णूच्या वृद्ध आईवडिलांनाही तिने दमदाटी केल्याची माहिती आहे. ती महिला बुधवारी सकाळी वसतिगृहातही उपस्थित होती. मात्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसताच तिने काढता पाय घेतला. तिच्या दबावामुळेच अजनी पोलीस बयान बदलण्यासाठी विष्णू व त्याच्या आईवडिलांवर दबाव टाकत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पवार कुटुंब बुधवारी दिवसभर दहशतीच्या सावटाखाली होते. पोलिसांचा बयान बदलविण्यासाठी वाढत्या दबावामुळे विष्णूसुद्धा घाबरला होता. वडील भारत पवार आणि आई मीना यांचीसुद्धा भेदरलेली अवस्था होती. शेवटी प्रसारमाध्यमांच्या रेट्यामुळे अजनी पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेता, विष्णूने दिलेल्या बयानावरून गुन्हा दाखल केला. विष्णूचे वडील भारत पवार यांनी आम्हाला न्याय द्या, अशी याचना केली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीCrimeगुन्हा