शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला विमान प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:55 IST

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले.

ठळक मुद्देदिल्लीच्या शाळा बघून भारावले विद्यार्थी : संसदेचे कामकाज बघणार, राष्ट्रपती भवनालाही देणार भेट 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले. यावेळी त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.केजरीवाल सरकारने दिल्लीच्या सरकारी शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे या शाळेची अनुभूती घेण्यासाठी शिक्षण विभागाने दिल्लीचा विशेष दौरा आयोजित केला होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही असाच बदल घडावा, या अपेक्षेतून हा दौरा आहे. बुधवारी दिल्लीला पोहचून विद्यार्थ्यांनी शाळांना भेटी दिल्या. गुरुवारी हे विद्यार्थी लोकसभेचे कामकाज बघणार आहे. राष्ट्रपती भवनालाही भेट देणार आहे.केजरीवाल सरकार सरकारी शाळांचा चेहरामोहरा बदलून अत्याधुनिक शिक्षण देत आहे. देशभरातून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ दिल्लीच्या शाळांना भेटी देत आहे. या दौऱ्यात नागपूर जिल्हा परिषदेतील ७० विद्यार्थ्यांसह १३ शिक्षक, ६ गट शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी व समग्र शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे हे सुद्धा आहेत. बुधवारी सकाळी ८.४० च्या इंडिगोच्या विमानाने हे सर्व दिल्लीत दाखल झाले. पहिल्यांदा विमानात बसणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद होता. विमानात बसल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. दिल्लीतील तीन शाळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. शाळेचा विकास व शिक्षणाची माहिती त्यांनी जाणून घेतली. दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी हे सर्व विद्यार्थी खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात लोकसभेचे कामकाज कसे चालते बघणार आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनालाही भेट देणार आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीIndigoइंडिगो