‘इग्नू’च्या अभ्यासक्रमांना प्रतिसाद : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या गावाची जबाबदारी विभागीय केंद्राकडेनागपूर : साधारणत: पदवी-पदव्युत्तर शिक्षणासाठी उपराजधानीतील विद्यार्थी मुंबई, पुणे या शहरांकडे धाव घेताना दिसून येतात. परंतु ‘इग्नू’च्या (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) पुढाकारानंतर हे चित्र उलट झाले आहे. शासकीय विज्ञान संस्थेत ‘इग्नू’द्वारे संचालित रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी मोठ्या शहरांमधून विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.‘इग्नू’तर्फे शासकीय विज्ञान संस्थेत ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅनालिटिकल केमेस्ट्री’ हा अभ्यासक्रम काही वर्षांअगोदर सुरू करण्यात आला. ‘बीएस्सी’नंतर किंवा सोबतच करता येणाऱ्या या अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेता मुंबई, पुण्याचे विद्यार्थी येथे येत आहेत. एकूण प्रवेश क्षमतेपैकी सुमारे २५ टक्के विद्यार्थी हे येथीलच असल्याची माहिती संस्थेतील सहयोगी प्राध्यापक डॉ.रश्मी बत्रा यांनी दिली. या अभ्यासक्रमासोबतच दूरस्थ शिक्षणाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ‘बीएस्सी’च्या प्रात्यक्षिकांसाठीदेखील विद्यार्थी नागपूरचीच निवड करत असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
विज्ञान अभ्यासक्रमांसाठी मुंबई, पुण्याचे विद्यार्थी नागपुरात
By admin | Updated: November 11, 2015 02:27 IST