शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी विद्यार्थी करणार पालकांना प्रेरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:09 IST

मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे.

ठळक मुद्देमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रम : विद्यार्थी भरणार संकल्प पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे.लोकशाहीत मतदान हे महत्त्वाचे आहे. मतदानाच्या बाबतीतदेखील लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजेचे आहे. प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही. लोकशाहीच्या मजबुती करण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अ‍ॅन्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’(स्विप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहर-ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.राज्यात सध्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये राज्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही सरासरीपेक्षा खालावत चालली असल्याचे चित्र आहे. ही मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावावा. यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पालक मतदान करतील. असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याअंतर्गत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील असे संकल्पपत्र भरून घेतील. शहर-जिल्ह्यात सरकारी व खासगी माध्यमांच्या सुमारे तीन हजारांवर शाळा असून, येथे अडीच लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांकडून हे संकल्पपत्र भरून घेत, त्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. व्हीपसाठी ग्रामीण भागात नोडल अधिकारी म्हणून जि.प.च्या पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ राजेंद्र भुयार यांची नेमणूक केली आहे. तर शहरी भागासाठी मनपाच्या उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील आठवडाभरात शाळांना विद्यार्थ्यांकडून हे संकल्पपत्र भरून घेत सदरचा अहवाल शिक्षण विभागाच्या माध्यमातून नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे.असे आहे संकल्प पत्रया संकल्पपत्रात विद्यार्थ्याला आपले नाव, वर्ग, शाळा लिहायची आहे. याद्वारे ‘संकल्प करतो की, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये माझे पालकांना मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याकरिता प्रवृत्त करील तसेच माझे परिसरातील अन्य व्यक्तींनादेखील मतदान करण्याकरिता प्रवृत्त करीन, असा संकल्प करीत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीVotingमतदान